विमान Takeoff होण्यापूर्वी इंजिनमध्ये फेकतात कोंबड्या, एअरलाइनचा ‘भयानक’ प्रयोग, कारण वाचून व्हाल शॉक
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ahmedabad Plane Crash : विमान टेकऑफ होण्यापूर्वी त्याच्या इंजिनमध्ये मृत कोंबड्या का फेकल्या जातात? यामागे एक गंभीर कारण दडलेलं आहे, जे ९९% लोकांना माहीत नसतं.
advertisement
1/10

आकाशात उंच भरारी घेणारं विमान... ते आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातं. पण, या प्रवासामागे किती मोठी सुरक्षा व्यवस्था असते, याची कल्पना आपल्याला नसते. विमानातील प्रत्येक भाग, प्रत्येक यंत्रणा कशी तपासली जाते, हे जाणून घेतलं तर खरंच थक्क व्हायला होतं. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, की विमान टेकऑफ होण्यापूर्वी त्याच्या इंजिनमध्ये मृत कोंबड्या का फेकल्या जातात? हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण यामागे एक गंभीर कारण दडलेलं आहे, जे ९९% लोकांना माहीत नसतं.
advertisement
2/10
जेव्हा विमान टेकऑफ होतं किंवा लँडिंग करतं, तेव्हा ते जमिनीच्या जवळ असतं. याच वेळी, आकाशात उडणारे पक्षी विमानाला धडकण्याची शक्यता खूप जास्त असते. तुम्हाला वाटेल, एका लहानशा पक्ष्याने एवढ्या मोठ्या विमानाचं काय बिघडणार? फार तर पक्षी मरेल, पण विमानाला काही होणार नाही. पण, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. काही वेळेस याच लहानशा पक्ष्यामुळे शेकडो निष्पाप लोकांचा जीव धोक्यात आला आहे, किंबहुना अनेकांचा जीव गेलाही आहे.
advertisement
3/10
विचार करा, जेव्हा एखादं विमान ताशी ३५० किलोमीटर वेगाने उडत असतं, तेव्हा त्याला एखादी छोटी वस्तू जरी धडकली तरी ते फुटू शकतं. अनेकदा, पक्षी आणि विमान यांच्यात टक्कर झाल्यावर विमानाची विंडशील्ड (पुढील काच) तुटते. एवढंच नाही, तर पायलटलाही दुखापत होऊ शकते. जर पक्षी विमानातील इंजिनमध्ये शिरला, तर इंजिनचे ब्लेड्स तुटू शकतात, आग लागू शकते किंवा इंजिन बंदही पडू शकतं. अशा परिस्थितीत, काही सेकंदातच विमान कोसळून मोठा अपघात होऊ शकतो. याच भयाण वास्तवाला सामोरं जाण्यासाठी एक विचित्र पण अत्यंत महत्त्वाची चाचणी केली जाते.
advertisement
4/10
जगभरातील सर्व विमान कंपन्या, विमान उड्डाण करण्यापूर्वी त्याची पूर्ण क्षमता आणि ताकद तपासतात. पक्ष्यांच्या धडकेमुळे कोणताही अपघात होऊ नये, यासाठी एक विशेष चाचणी केली जाते. याच चाचणीसाठी, विमान उड्डाण करण्यापूर्वी इंजिनमध्ये कोंबड्या फेकल्या जातात.
advertisement
5/10
हे ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल, पण ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. विमानावर पक्ष्यांच्या धडकेचा काय परिणाम होतो हे तपासण्यासाठी 'चिकन गन' (Chicken Gun) नावाचं एक खास यंत्र वापरलं जातं. हे यंत्र म्हणजे हवेने भरलेली एक मोठी तोफ असते. ही तोफ विमानाची विंडशील्ड, पंख आणि इंजिनवर ठेवली जाते. हे यंत्र अशा प्रकारे सेट केलं जातं की, ते एका पक्ष्याच्या खऱ्या धडकेच्या वेगाने कोंबडीला फेकतं.
advertisement
6/10
ही चाचणी सहसा प्रयोगशाळेत (Laboratory) केली जाते. कोंबडी इंजिनला धडकल्यानंतर, अभियंते ते हाय-स्पीड कॅमेऱ्याने रेकॉर्ड करतात आणि झालेल्या नुकसानीचं विश्लेषण करतात. ही इंजिन चाचणी खऱ्या कोंबडीवरच केली जाते, कारण तिचं वजन आणि आकार आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांसारखं असतं. आजकाल, सर्व प्रमुख विमान उत्पादक ही पद्धत अवलंबत आहेत.
advertisement
7/10
विमान टेकऑफ होण्यापूर्वी 'बर्ड स्ट्राइक टेस्ट' (Bird Strike Test) नावाची ही खास चाचणी केली जाते. यामध्ये, विमानाचे इंजिन, कॉकपिट विंडशील्ड, पंख यांसारख्या भागांना एका मजबूत फ्रेमवर बसवलं जातं. त्यानंतर, इंजिनमध्ये कोणती वस्तू टाकून चाचणी करायची हे ठरवलं जातं.
advertisement
8/10
या चाचणीसाठी मृत कोंबडी किंवा नकली पक्षी किंवा जिलेटिन बॉल वापरला जातो. सहसा, खरी कोंबडीच वापरली जाते. त्यानंतर एक विशेष एअर गन किंवा तोफ लावली जाते, जी विमान उडत असतानाच्या वेगाने (ताशी ३००-५०० किलोमीटर) कोंबडीला फेकते.
advertisement
9/10
विमानाच्या महत्त्वाच्या भागावर कोंबडी आदळल्यावर, प्रत्येक क्षण हाय-स्पीड कॅमेरात रेकॉर्ड केला जातो. यामुळे किती नुकसान झालं आणि ते कुठे झालं हे पाहता येतं. अभियंते आणि तंत्रज्ञ हे तपासतात की, इंजिनचे ब्लेड्स तुटले आहेत का, विंडशील्ड तुटली आहे का आणि विमानाचे पंख खराब झाले आहेत का. जर मोठं नुकसान झालं नसेल, तरच विमान उड्डाण करू शकतं.
advertisement
10/10
इंजिन चाचणीसाठी काही नियम आणि अटी असतात. एक कोंबडी विमानातील इंजिनमध्ये अडकली तरी, ते कमीतकमी २ मिनिटांसाठी ७५% थ्रस्टवर (पूर्ण शक्तीच्या ७५%) काम करायला हवं. पायलटला आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी हे आवश्यक आहे. ही चाचणी आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचा एक भाग आहे. कोणतंही विमान ही चाचणी पास केल्याशिवाय उडू शकत नाही. शेकडो प्रवाशांच्या जीवाची ही जबाबदारी असते आणि म्हणूनच, हे क्रूर वाटणारं सत्य एका मोठ्या सुरक्षिततेचा भाग आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
विमान Takeoff होण्यापूर्वी इंजिनमध्ये फेकतात कोंबड्या, एअरलाइनचा ‘भयानक’ प्रयोग, कारण वाचून व्हाल शॉक