TRENDING:

दरवाजाच्या हँडलला हात लावताच करंट बसतो? हल्ली ऑफिसमध्ये शॉक लागण्याचं प्रमाण का वाढलंय? जाणून घ्या यामागचं विज्ञान

Last Updated:
विजेचा काहीही संबंध नसताना हा करंट का लागतो? कधी कधी प्लास्टिकच्या खूर्चीला देखील हा करंट लागतो अशावेळी प्रश्न उभा रहातो की हा करंट लागला कसा? चला, सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
1/7
हल्ली ऑफिसमध्ये शॉक लागण्याचं प्रमाण का वाढलंय? जाणून घ्या यामागचं विज्ञान
हल्ली ऑफिसमध्ये करंट लागण्याचं प्रमाण वाढलं आहे. कधी ऑफिसमध्ये खुर्चीला स्पर्श करताच, कधी कोणाला हात लावताच, तर कधी दरवाजाच्या हँडलला हात लावाच विजेचा झटका बसतो. अशावेळी लोकांना प्रश्न पडतो की असं का होतंय किंवा असा सौम्य शॉक मला का जाणवतोय?
advertisement
2/7
पण विजेचा काहीही संबंध नसताना हा करंट का लागतो? कधी कधी प्लास्टिकच्या खूर्चीला देखील हा करंट लागतो अशावेळी प्रश्न उभा रहातो की हा करंट लागला कसा? चला, सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
3/7
करंट का लागतो?हा जो हलका झटका बसतो, त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज (ESD) म्हणतात. आपल्या शरीरात स्थिर वीज (Static Electricity) साठते आणि जेव्हा आपण धातूच्या किंवा कोणत्याही विद्युत वाहक वस्तूला स्पर्श करतो, तेव्हा ती वीज बाहेर पडते आणि आपल्याला सौम्य करंट जाणवतो.
advertisement
4/7
हिवाळ्यात करंट जास्त का लागतो?हिवाळ्यात हवेत ओलावा कमी असतो, त्यामुळे इलेक्ट्रिक चार्ज लवकर बाहेर पडत नाही.कोरड्या हवेमुळे स्थिर वीज शरीरात जास्त प्रमाणात साठते.तुम्ही स्वेटर किंवा कोरड्या कपड्यांवर हात फिरवला तरीही चार्ज तयार होतो.
advertisement
5/7
प्लास्टिकच्या खुर्चीवर बसल्यावर का करंट जाणवतो?जेव्हा तुम्ही प्लास्टिकच्या खुर्चीवर बसता, तेव्हा हालचालीमुळे तुमच्या कपड्यांमध्ये आणि खुर्चीत वीज जमा होते. मग खुर्चीवरून उठताच हा चार्ज खुर्चीकडे परत जातो, आणि तुम्हाला हलका करंट जाणवतो.
advertisement
6/7
कार्पेटवर चालताना करंट का लागतो?जेव्हा तुम्ही कार्पेटवर चालता, तेव्हा तुमच्या शरीरात नकारात्मक चार्ज साठतो. नंतर धातूच्या वस्तूला हात लावताच हा चार्ज स्पार्कच्या रूपात बाहेर पडतो आणि तुम्हाला झटका जाणवतो.
advertisement
7/7
करंटपासून वाचण्यासाठी उपायशक्यतो मेटलऐवजी लाकडी किंवा इतर नॉन-कंडक्टिव्ह वस्तू वापरा.कोरड्या हवेत लहान ह्युमिडिफायर (हवा ओलसर ठेवणारे उपकरण) वापरा.कपडे आणि वस्तूंवर एंटी-स्टॅटिक स्प्रे फवारला तरी फायदा होतो.शरीरात व्हिटॅमिन B12, B6 आणि B1 ची कमतरता असल्यासही हा त्रास होऊ शकतो, त्यामुळे योग्य आहार घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
दरवाजाच्या हँडलला हात लावताच करंट बसतो? हल्ली ऑफिसमध्ये शॉक लागण्याचं प्रमाण का वाढलंय? जाणून घ्या यामागचं विज्ञान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल