TRENDING:

chilled beer: चिल्ड बिअर चवीला का लागते चांगली? यामागे आहे वैज्ञानिक कारण

Last Updated:
सध्या कुठलाही लहान-मोठा प्रसंग असो काही जण अतिशय सहजपणे बिअर पितात. बिअर हे जगातील सर्वात जुनं आणि सर्वाधिक प्रमाणात प्यायलं जाणारं अल्कोहोलिक ड्रिंक आहे. पाणी आणि चहानंतर तिसरे सर्वात लोकप्रिय ड्रिंक म्हणून बिअरकडे पाहिलं जातं.
advertisement
1/8
chilled beer: चिल्ड बिअर चवीला का लागते चांगली? यामागे आहे वैज्ञानिक कारण
सध्या कुठलाही लहान-मोठा प्रसंग असो काही जण अतिशय सहजपणे बिअर पितात. बिअर हे जगातील सर्वात जुनं आणि सर्वाधिक प्रमाणात प्यायलं जाणारं अल्कोहोलिक ड्रिंक आहे. पाणी आणि चहानंतर तिसरे सर्वात लोकप्रिय ड्रिंक म्हणून बिअरकडे पाहिलं जातं.
advertisement
2/8
बिअर सहसा थंडगार प्यायली जाते. यामागे वैज्ञानिक कारण आहे. मॅटर जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनात थंड बिअरची चव जास्त चांगली का असते हे स्पष्ट केलं आहे.
advertisement
3/8
संशोधकांनी पाण्याचा गुणधर्म आणि अल्कोहोलयुक्त पेयांमध्ये असलेल्या इथेनॉलच्या रेणूंचा अभ्यास केला आहे. त्यावरून थंड बिअरची चव चांगली का लागते याचं कारण स्पष्ट केलं आहे.
advertisement
4/8
संशोधनात असं निदर्शनास आलं की, इथेनॉलच्या रेणूंची चव पाण्याच्या तापमानानुसार बदलते आहे. रिसर्चच्या लेखकांपैकी एक असलेले प्रोफेसर ली जियांग ‘द टेलिग्राफ’ला म्हणाले, "आमच्या रिसर्चच्या निष्कर्षांमुळे लोकांना थंडगार बिअर जास्त का आवडते या मताला बळकटी मिळाली आहे. कमी तापमानामुळे बिअरमधील वैशिष्ट्ये वाढतात आणि पिणाऱ्यांना ती अधिक चवदार लागते."
advertisement
5/8
रिसर्चर्सच्या असं लक्षात आलं की, इथेनॉलचे रेणू वेगवेगळ्या तापमानात वेगवेगळ्या पेयांमध्ये विशिष्ट आकार धारण करतात. जेव्हा बिअरसारखं कमी-अल्कोहोलयुक्त पेय कमी तापमानात ठेवलं जातं तेव्हा इथेनॉलचे रेणू पिरॅमिडचा आकार धारण करतात.जर जास्त अल्कोहोल असलेल्या पेयांचं तापमान थोडं जास्त असेल तर त्यांच्यातील इथेनॉल रेणू साखळीसारख्या आकारात असतात.
advertisement
6/8
प्रोफेसर ली जियांग म्हणाले, "जेव्हा तापमान कमी होतं तेव्हा इथेनॉलचे रेणू एकमेकांच्या जवळ येतात. त्यामुळे थंडगार बिअरची चव चांगली लागते. पिरॅमिडच्या आकाराच्या इथेनॉल रेणूंची चव साखळीच्या आकारातील रेणूंपेक्षा अधिक ताजी वाटते".
advertisement
7/8
बिअरवर झालेल्या आणखी एका संशोधनात असं समोर आलं की, हवामान बदलाचा बिअरवरही परिणाम होत आहे. नेचर कम्युनिकेशन्स या सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटलं आहे की, हवामान बदलामुळे बिअरच्या किमती वाढतील आणि तिची चवही बदलेल.
advertisement
8/8
पृथ्वीचे वाढतं तापमान आणि इतर कारणांमुळे बिअर तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हॉप फुलांची संख्या आणि गुणवत्ता कमी होऊ शकते. परिणामी बिअरची किंमत आणि चव दोन्ही बदलू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
chilled beer: चिल्ड बिअर चवीला का लागते चांगली? यामागे आहे वैज्ञानिक कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल