पॅनच्या हँडलला होल फक्त लटकवण्यासाठी नाही; आहे वेगळाच वापर, कुणालाच माहिती नसेल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Hole On Pan Handle : पॅनच्या हँडलला होल का असतो असं विचारलं तर जवळपास सगळ्यांचं उत्तर असेल लटकवण्यासाठी पण याचे आणखीही काही फायदे आहेत.
advertisement
1/5

पॅन, तवा आपण सगळेच वापरतो. त्याला हँडल असतो आणि या हँडलच्या टोकाला एक होल असतो. आता कोणत्याही भांड्याच्या हँडलला होल म्हणजे सामान्यपणे आपल्याला तो फक्त लटकवण्यासाठी वाटतो. पण हा होल फक्त लटकवण्यासाठी नाही तर त्याचा आणखी एक वेगळाच वापर आहे, तो कदाचित कुणालाच माहिती नसेल.
advertisement
2/5
पॅनच्या हँडलला असलेला हा होल तसं तर तो प्रामुख्याने हुकवर, रॉडवर, भिंतीला टांगता यावा यासाठी दिलेला असतो. त्यामुळे जागा वाचते आणि भांडं पटकन मिळतं.
advertisement
3/5
दुसरं म्हणजे पॅन धुऊन टांगून उलटा ठेवलाला की भांड्यातील पाणी लवकर निथळतं. त्यामुळे पाणी साचून राहत नाही, भांडं लवकर सुकतं आणि त्याला वास येत नाही किंवा ओलं राहून गंज येत नाही.
advertisement
4/5
काही कढईंच्या हँडलचा होल असा डिझाइन केलेला असतो की स्वयंपाक करताना पळी किंवा चमचा त्या होलमध्ये अडकवता येतो म्हणजे तेल किंवा भाजी खाली गळते, गॅस स्वच्छ राहतो. पण हे सर्व कढईंमध्ये नसतं, फक्त काही मॉडेल्समध्ये असतं.
advertisement
5/5
होलमुळे हँडलचं वजन थोडं कमी होतं, उष्णता धरून ठेवण्याची क्षमता कमी होते म्हणजे कढई पकडताना थोडी कमी गरम वाटू शकते. कढई तयार करताना हँडल मोल्डिंग, हँगिंग टेस्ट, क्वालिटी चेक यासाठी होल उपयोगी पडतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
पॅनच्या हँडलला होल फक्त लटकवण्यासाठी नाही; आहे वेगळाच वापर, कुणालाच माहिती नसेल