हरियाणामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसला होता. त्यानंतर आता राज्यातील सत्ता जाण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात येत आहे. हरियाणात काँग्रेस प्रचंड बहुमतासह सत्तेत परत असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. हरियाणात काँग्रेसला 90 पैकी 50 हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हरियाणाचा एक्झिट पोल काय?
इंडिया टुडे-सी व्होटर्स
advertisement
भाजप एनडीए आघाडी - 50 ते 58
काँग्रेस इंडिया आघाडी - 20 ते 28
जेजेपी - 0 ते 2
इतर - 10 ते14
टाईम्स नाऊ
भाजप एनडीए आघाडी - 22 ते 32
काँग्रेस इंडिया आघाडी - 50 ते 64
इतर - 2 ते 8
न्यूज 24 चाणक्य
भाजप एनडीए आघाडी - 18 ते 24
काँग्रेस इंडिया आघाडी - 55 ते 62
इतर - 2 ते 5
रिपब्लिक टीव्ही
भाजप एनडीए आघाडी - 18 ते 24
काँग्रेस इंडिया आघाडी - 55 ते 62
इतर - 2 ते 5
भास्कर रिपोर्टर्स पोल
भाजप एनडीए आघाडी - 19 ते 29
काँग्रेस इंडिया आघाडी - 44 ते 54
जेजेपी - 1
आयएनएलडी - 1 ते 5
जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभा
तर, दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील. पण बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज आहे. तर, भाजपला जम्मू भागात चांगले यश मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलनुसार, जम्मू-काश्मीरमधील सत्तेच्या चाव्या या पीडीपी आणि इतर लहान घटक पक्ष, अपक्षांकडे असणार आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
इंडिया टुडे-सी व्होटर
नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस - 40 ते 48
भाजप - 27 ते 32
पीडीपी - 6 ते 12
इतर - 6 ते11
रिपब्लिकन गुलिस्तान न्यूज
नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस -28 ते 30
भाजप - 28 ते 30
पीडीपी - 5 ते 7
इतर - 8 ते 16
न्यूज 24 चाणक्य
नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस - 46 ते 50
भाजप - 23 ते 27
पीडीपी - 7 ते 11
इतर - 4 ते 6
महापोल
नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस - 40
भाजप - 26
पीडीपी - 7
इतर - 17