अजित पवार यांच्यासोबतच्या संवादाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, की सव्वा वर्षापासून आमच्यात काहीही संवाद झालेला नाही. आमचं काहीही बोलणं झालं नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, की 1500 रुपयांनी नाती जोडता येत नाही. व्यवहार आणि नात्यातला फरक त्यांना कळला नाही, असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.
advertisement
लाडकी बहीण-भाऊ योजनेचं क्रेडिट जनतेला जातं. त्यांनीच लोकसभेला आम्हाला जास्त जागा दिल्याने सरकारने हा निर्णय घेतला. मात्र, आम्हाला मतदान झालं नाही तर त्या यादीतील नावं काढून टाकू, अशी धमकी जनतेला दिली जात आहे. भाऊ-बहिणीच्या नात्याचा जो अपमान झालाय, त्याचं मला दुःख वाटतं. त्यांच्यातीलच काही लोक म्हणतात, की एक बहीण गेली तर काय झालं? आम्ही दुसऱ्या जोडतो. मात्र, ही प्रेमाची, विश्वाची नाती असतात. ती 1500 रुपयांनी जोडता येत नाहीत. हे सरकार नातं आणि व्यवहार यात गल्लत करतंय. सगळं पैशाने विकत घेता येत नाही, असं त्या म्हणाल्या. लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ
हे स्वअनुभवावरून बोलताय का? असं विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, की अनुभवाचं नाही. मला कोणी एखादी गोष्ट मागितली तर द्यायला फार हरकत नसते. मला जर मागितलं असतं तर राजीखुशी दिलं असतं, असं त्या म्हणाल्या. कुठल्याही भावाने मागितलं असतं तर प्रेमाने दिलं असतं. ओरबाडून घेण्यात काही मजा नसते. पक्षाची कमान त्यांच्या हातात होती . अध्यक्षपदाबाबतही निर्णय होणार होता. मात्र, त्यांनी आधीच निर्णय घेतला, असंही त्या अजित पवारांबाबत बोलताना म्हणाल्या
