TRENDING:

तब्बल 30 वर्षांची परंपरा, पुण्यातील याठिकाणी मिळते इलायची, केसरयुक्त खरवस, दरही सुलभ

Last Updated:

खरवस हा म्हशीच्या किंवा गाईच्या दुधापासून बनवला जातो आणि यामध्ये खूप जास्त प्रोटीन मिळते. त्यामुळे खरवस हे आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : महाराष्ट्राची खाद्य संस्कृती ही जगात नावाजली जाते. महाराष्ट्रातील विविध भागातील पदार्थ हे संपूर्ण देशातच नव्हे तर देशाबाहेरही नावाजले आहेत. पुण्यातही आपल्याला वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतात आणि त्यांची चव ही काही वेगळीच असते. तसेच पुण्यातील जे. एम. रोड या ठिकाणी असलेले श्री कृष्णा खरवस हे 30 वर्ष जुने दुकान आहे. इथे केसर, विलायची असे खरवस प्रकार आहेत. तेही अगदी स्वस्तामध्ये मिळतात. याबाबतच लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.

advertisement

खरवस हा म्हशीच्या किंवा गाईच्या दुधापासून बनवला जातो आणि यामध्ये खूप जास्त प्रोटीन मिळते. त्यामुळे खरवस हे आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. याची किंमत ही कमी आहे. याठिकाणी अगदी 40 रुपये प्लेटमध्ये हे खरवस खायला मिळते. त्यामुळे प्युअर दुधापासून बनवलेल खरवस खायचं असेल तर या ठिकाणाला नक्कीच जाऊ शकता.

दादरमध्ये याठिकाणी मिळतं अगदी घरगुती जेवण, शुद्ध तुपातले मोदक अन् पुरणपोळीची चवही चाखता येणार!

advertisement

मागील 30 वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय करत आहोत. आमच्या आजोबांनी हा व्यवसाय सुरू केला होता. आता आमची ही तिसरी पिढी आहे. सध्या आमच्याकडे 2 प्रकार आहेत. मात्र, पूर्वी 8 ते 10 प्रकार हे यामध्ये होते. म्हणजे आईस्क्रीम फ्लेवर इत्यादी जे फ्लेवर आहेत, ते सर्व प्रकार यात होते. मात्र, लोकांची जास्त मागणी ही केसर आणि विलायची या दोन प्रकारांना आहे.

advertisement

बहीण-भावाच्या नाश्ता सेंटरवर मिळतो अनोखा पदार्थ, कोल्हापुरात फक्त इथेच मिळतो, खवय्यांची होते मोठी गर्दी

40 रुपये प्लेट तर पाव किलो, अर्धा किलो आणि एक किलो अशा पद्धतीने हे विकले जाते. एक किलो खरवस हे 400 रुपयांना विकले जातात, अशी माहिती येथील व्यावसायिक कृष्णा परदेशी यांनी दिली. तुम्ही पुण्यात असाल आणि तुम्हालाही जर हे खरवस खायचे असतील तर तुम्ही याठिकाणी नक्की भेट देऊ शकतात.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
तब्बल 30 वर्षांची परंपरा, पुण्यातील याठिकाणी मिळते इलायची, केसरयुक्त खरवस, दरही सुलभ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल