TRENDING:

वाचाल तर वाचाल! डोयफोडे दाम्पत्याने वाचनप्रेमींसाठी सुरू केले फिरते ग्रंथालय; कुठे सुरू आहे हा उपक्रम?

Last Updated:

थोडक्या पण प्रभावी व्यक्तींमध्ये पुण्यातील म्हाळुंगे भागात राहणारे विजय आणि विनया डोयफोडे यांचा समावेश आहे. 2016 सालापासून त्यांनी सुरू केलेला ‘विनया चल ग्रंथालय’ हा उपक्रम आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाचनसंस्कृतीचा एक अभिनव उपक्रमा बनला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: 'वाचाल तर वाचाल' हे वाक्य आपण नेहमी ऐकतो आणि वाचनाची ही संस्कृती खऱ्या अर्थाने समाजात रुजवण्यासाठी सातत्याने काम करणारी माणसं फारच थोडी आहेत. अशा थोडक्या पण प्रभावी व्यक्तींमध्ये पुण्यातील म्हाळुंगे भागात राहणारे विजय आणि विनया डोयफोडे यांचा समावेश आहे. 2016 सालापासून त्यांनी सुरू केलेला ‘विनया चल ग्रंथालय’ हा उपक्रम आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाचनसंस्कृतीचा एक अभिनव उपक्रमा बनला आहे.
advertisement

या उपक्रमाची सुरुवात अत्यंत साध्या पद्धतीने झाली. नोकरीचे काम सांभाळून रात्रीच्या वेळी विजय आणि विनया यांनी एकत्र 40 पुस्तकांची खरेदी केली. वाचनाची आवड असणाऱ्यांकडे वेळ कधी असतो तर कधी जागा नसते, पण पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, या विचारातून त्या दोघांनी दुचाकीवरून घराघरांत पुस्तक पोहोचवणे सुरू केले. आज या छोट्याशा उपक्रमाचं वटवृक्षात रूपांतर झाले असून पुस्तकांची संख्या तब्बल 4 हजारांवर गेली आहे. वाचकांच्या मागण्यांनुसार नवी पुस्तकं खरेदी करून ग्रंथालयाचा सतत विस्तार करण्यात आला.

advertisement

‘विनया चल ग्रंथालय’चे सभासद आज 500 च्या घरात आहेत. सुरुवातीचे तीन वर्ष केवळ 100 सभासद तयार करण्यात गेले, पण नंतरच्या काळात मिळालेल्या लोकप्रतिसादामुळे सभासद संख्या झपाट्याने वाढली. कात्रज, आंबेगाव, वारजे, धायरी, सिंहगड रोड, कर्वेनगर, कोथरूड, बावधन, औंध, शिवाजीनगर, हिंजवडी, पिंपरी-चिंचवडपासून कासारवाडीपर्यंत या ग्रंथालयाची रिक्षा फिरत राहते. विजय डोईफोडे सांगतात, "शहराचा विस्तार सतत वाढतो आहे. त्यामुळे सर्व भागात पोहोचणे शक्य होत नाही. अशा पद्धतीचं काम इच्छुकांनी त्यांच्या भागातून सुरू करावं, आम्ही त्यांना जरूर मार्गदर्शन करू."

advertisement

वाचनप्रेमींसाठी ही घरपोच सेवा खऱ्या अर्थाने वरदान ठरली आहे. उपक्रमाच्या सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचाही सामना करावा लागला. पावसाळ्यात दुचाकीवर प्रवास करताना पुस्तके सुरक्षित ठेवणे, वेळेचे व्यवस्थापन, रात्री उशिरापर्यंत पुस्तके पोहोचवण्याचे काम पण या सगळ्यांवर मात करत नंतर त्यांनी स्वतःची रिक्षा घेतली आणि सेवा अधिक सुरळीत झाली. त्यांच्या मुलीचेदेखील या कामात सक्रिय योगदान असते. या ग्रंथालयातून वाचकांना दर महिन्याला पाच पुस्तकं दिली जातात. कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, कथासंग्रह, आध्यात्मिक, ऐतिहासिक, प्रेरणादायी अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा समृद्ध संग्रह वाचकांसाठी उपलब्ध आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्हाला माहितीये का? नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्यातला नेमका फरक; समजून घ्या!
सर्व पहा

याचबरोबर ‘विनया चल लेखन कट्टा’ हा उपक्रमही सातत्याने राबवला जातो. येथे सभासद त्यांच्या लेखनाची देवाणघेवाण करतात, चर्चासत्रे घेतली जातात आणि साहित्यिक संवाद घडवले जातात. वार्षिक मेळाव्यात वाचनाची आवड असलेल्या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. दुचाकीवरून सुरू झालेला हा साधा उपक्रम आज अनेक वाचकांसाठी प्रेरणा बनला आहे. जुन्या काळातील वाचनालय संस्कृतीला आधुनिक पद्धतीने पुन्हा जिवंत करण्याचं काम डोयफोडे दाम्पत्य करत आहे. त्यांच्या सातत्य, प्रेम आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोनामुळे ‘विनया चल ग्रंथालय’ हा उपक्रम आज पुण्यातील वाचन संस्कृतीचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
वाचाल तर वाचाल! डोयफोडे दाम्पत्याने वाचनप्रेमींसाठी सुरू केले फिरते ग्रंथालय; कुठे सुरू आहे हा उपक्रम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल