अजित पवारांच्या विमानात कोण कोण होतं?
या विमानात एकूण अजित पवारांसह पाच प्रवाशी होते. अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ एचसी विदीप जाधव विमानात उपस्थित होते. तर पायलट कॅप्टन सुमित कपूर यांचा देखील मृत्यू झाला आहे. तसेच कॅप्टन संभवी पाठक यांचा देखील मृत्यू झाला आहे. फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांना देखील जीव वाचवता आला नाही.
advertisement
advertisement
समर्थकांना अश्रू अनावर झाले...
बारामतीतील रुग्णालयात मोठा जणसमुह पहायला मिळाला. अजित पवार यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले. तर अनेक मोठे नेते रुग्णालयात दाखल होत आहे. सुप्रिया सुळे देखील दिल्लीवरून रवाना झाल्या आहेत. अजित पवार यांचे खंदे समर्थक समजले जाणारे आमदार अमोल मिटकरी यांना अश्रू अनावर झाले. रडता रडता ते गाडीतून बारामतीला रवाना झाले आहेत.
advertisement
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 10:56 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar Death : अपघात झाला तेव्हा अजित पवारांसह विमानात कोण कोण होतं? पाच जणांची नावं समोर!
