अजित पवारांचा शेवटचा फोन
अपघातापूर्वी अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना झाला होता. विमानात बसण्यापूर्वी अजित पवारांचं राणाजगजीतसिंह यांच्यासोबत बोलणं झालं होतं. मी नंतर फोन करतो म्हणत अजित पवार यांनी नंतर फोन करण्याचं आश्वसन दिलं होतं. त्यानंतर बारामतीत उतरल्यावर पुढील बोलणं होणार होतं पण त्याआधीच अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला.
advertisement
राणाजगजीतसिंह पाटील बारामतीकडे रवाना
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या आत्या आहेत. राणाजगजीतसिंह पाटील कुटुंब बारामतीकडे रवाना झालंय. राणाजगजीतसिंह पाटील आणि अजित पवार यांचे चांगले संबंध होते. अजित पवार वेळोवेळी त्यांच्याकडून माहिती घेत होते. जिल्हापरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार त्यांच्याशी चर्चा करणार होते, अशी माहिती देखील समोर आली आहे.
ब्रिच कँडी रुग्णालयात चेकअप
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर शरद पवार यांना सकाळी ब्रिच कँडी रुग्णालयात चेकअप करण्यासाठी नेण्यात आले. तपासणीनंतर शरद पवार पुन्हा सिल्वर ओक वरती आले आणि आता ते पुन्हा वाहनाने बारामतीसाठी निघाले आहे.
