माझं टक्कल पडलं तरी हे मलाच...
राजगुरुनगर येथील भरसभेत अजित पवारांनी बाबा लोकांचे ऐकावं लागतं. कोणत्या बाबा लोकांचे ते तुम्ही ठरवा, असं मिश्किल विधान अजित पवारांनी केलंय. राजगुरुनगर येथील सभा सुरु असताना अजित पवारांना बाबा राक्षे हे काही मुद्दे देत असताना आता मला शिकवायला लागलेत, आता असं तसं बोला माझं टक्कल पडलं तरी हे मलाच शिकवतात काय करावं, असं म्हणत अजित पवारांनी बाबा राक्षेंच्या कृतीचे मिश्किल टिपणी केली.
advertisement
70 हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केला पण...
मी कामाचा माणूस आहे, माझी प्रशासनावर पकड आहे. मात्र काही लोकं माझ्यावर आरोप करतात. मी असा आहे, तसा आहे, 70 हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केला. पण मी एक रुपयांचा मिंदा नाही. तुम्ही दाखवून द्या, की मी कामं करताना कोणाकडून पैसे घेतले किंवा चिरीमिरी द्यावी लागली. उलट प्रशासन मला टरकून राहतात, असं वक्तव्य अजित पवार यांनी यावेळी केलं.
परत म्हणाल मी दम दिला... - अजित पवार
येत्या हिवाळी अधिवेशनात तुमचा प्रश्न मार्गी लावतो. आत्ता आचारसंहिता असल्यानं मला स्पष्टपणे बोलता येणार नाही. मात्र या अधिवेशनात तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी किती निधी लागेल, त्यासाठी काय करावं लागेल, हे पाहतो. पण आचारसंहितेमध्ये मला यावर बोलता येणार नाही, असंही अजित पवार म्हणाले आहेत. तुम्ही माझं ऐकलं तर मी तुमचं ऐकेन. परत म्हणाल मी दम दिला. म्हणून तुम्ही माझी विनंती ऐकली तर मी तुमची विनंती ऐकेन, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
