छत्रपती संभाजीनगर येथील मिटमिटा येथे वैशाली लिंभारे यांच्याकडे वडिलोपार्जित 16 एकर शेती होती. शेतीमध्ये काहीतरी नवीन करायचं ही संकल्पना मनात ठेवून त्यांनी 2016 मध्ये आदित्य ऍग्रो टुरिझम पर्यटन केंद्राची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळाला; मात्र खचून न जाता व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. मग त्यामध्ये सोशल मीडियाचा वापर असो किंवा प्रत्यक्षरीत्या लोकांना भेटून या पर्यटन स्थळाची माहिती दिली.
advertisement
आता सध्याच्या घडीला पर्यटन केंद्रामध्ये पुणे, नाशिक, जळगाव, मालेगाव, चाळीसगाव यासह छत्रपती संभाजीनगर शहरातून मोठ्या प्रमाणात येथे आनंद लुटण्यासाठी येत असतात. हे स्थळ या परिसरामध्ये जुने व प्रसिद्ध मानले जाते. त्यामुळे येथे विशेषतः शनिवार आणि रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. सुट्टीच्या दिवशी शाळा, कॉलेजमधून विद्यार्थी देखील या ठिकाणी हुरडा खाण्यासाठी तसेच विविध खेळांचा अनुभव घेण्यासाठी येत असतात.
कृषी पर्यटन केंद्र कसे सुरू करावे?
नवीन शेतकऱ्यांना किंवा व्यवसायिकांना कृषी पर्यटन केंद्र सुरू करायचे झाल्यास त्यांनी स्वतः मेहनत घेण्याची तयारी ठेवावी, तसेच तेव्हाच हा व्यवसाय पुढे नेता येईल, असे देखील लिंभारे यांनी सांगितले.





