चार्टर्ड विमानाने अजित पवार मुंबईवरून बारामतीला आले पण विमान लँडिंग करताना मोठा अपघात घडला. अजित पवार यांचे विमान बारामतीमध्ये उतरणार होते. तेव्हा काटेवाडी येथील घरी आपल्या आईची भेट घेण्याची त्यांची पहिली इच्छा होती. मातोश्रींचे आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी ते सभा घ्यायला रवाना होणार होते, असं दादांचे जवळचे सहकारी आणि विद्या प्रतिष्ठानचे किरण गुजर यांनी म्हटलं आहे.
advertisement
Courtesy -: Video Grap
अंत्यसंस्कार होण्याआधीच राजकीय हातलाची सुरू झाल्या पण लेकावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आशाताईंना रडू कोसळलं. आशाताई हतबल झाल्या. आपल्या लेकराच्या अस्ती हातात घेताना त्यांच्या मनाला खोलवर वेदना झाल्या असाव्यात. अपघाताच्या दिवशी, अजित पवारांच्या आई आशाताई पवार टीव्ही पाहत बसल्या होत्या. याच वेळी अचानक अजित पवारांच्या अपघाताची बातमी टीव्हीवर झळकली अन् फार्म हाऊसवर एकच धावाधाव सुरू झाली होती.
दरम्यान, अजित पवार यांचा मला फोन आला होता. काही कागदपत्रे माझ्याकडे सोपवायची होती. सकाळी 8:45 वाजता विमानाने उतरतील आणि आधी त्यांच्या आईला भेटण्यासाठी काटेवाडीला जातील, असं त्यांनी सांगितलं होतं, असंही किरण गुजर यांनी म्हटलं.
