... तर बिल्डरांचं काम थांबवा - अजित पवार
केशवनगर परिसरात होत असलेला उड्डाणपूल, मुंढवा सिग्नल परिसर आणि गाडीतळ भागातील रस्त्यांची देखील अजित पवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवा, अशा सुचना देखील अजित पवार यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी फ्लॅट घेऊन जर बिल्डर लोकांना मस्ती आली असेल तर जे आपल्या हातात आहे ती ॲक्शन घ्या, असे स्पष्ट आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. केशवनगर भागातील काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही ही तक्रार नागरिकांनी आज सकाळी अजित पवारांकडे केली. यानंतर अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना देखील फोन लावत चौकशी केली.
advertisement
ज्याला दारू घ्यायची आहे तो... - अजितदादा भडकले
मुंढवा केशनवगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीनंतर अजित पवार म्हणाले, "ज्याला दारू घ्यायची आहे तो नियमांनी घेईल आणि घरी जाऊन पीत बसेल. तुम्ही शहाणे बना आणि अवैध दारू विक्री करण्याचे धंदे बंद करा." त्यांनी यावेळी अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला.
वाहतूक कोंडीचीही पाहणी
अजित पवारांनी मुंढवा आणि केशवनगर परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येचीही पाहणी केली. वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली आणि सिग्नल यंत्रणा तात्काळ व्यवस्थित करण्याचे आदेश दिले. त्यांच्यासोबत महापालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. या दौऱ्यात अजित पवारांनी शहरात सुरू असलेल्या विविध उड्डाणपुलांच्या आणि विकासकामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.