Farming Machine: शेतकरी पुत्रांची कमाल! एकाच मशीनने होणार तीन कामं, पेटंटही मिळवलं

Last Updated:

Farming Machine: शेतकऱ्यांची मुलं असलेल्या चार विद्यार्थ्यांनी कमीत कमी खर्चात हे मशीन बनवण्याचा प्रयत्न केला.

+
Farming

Farming Machine: शेतकरी पुत्रांची कमाल! एकाच मशीनने होणार तीन कामं, पेटंटही मिळवलं

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील केगाव येथील 'सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग' या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी एक अनोखं मशीन बनवलं आहे. या मशीनमुळे वखरणी, पेरणी आणि फवारणी ही तिन्ही कामं करता येतील. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे ते चौघे शेतकऱ्यांची मुलं आहेत. विद्यार्थी चेतन म्हेत्रे याने Local 18 शी बोलताना या मशीन संदर्भात अधिक माहिती दिली.
केगाव येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी चेतन म्हेत्रे याने मागील वर्षी पास आऊट झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या साथीने हा प्रोजेक्ट बनवला आहे. विद्यार्थ्यांनी कमीत कमी खर्चात हा प्रोजेक्ट बनवण्याचा प्रयत्न केला. शेतामध्ये नांगरणी करण्यासाठी बैल जोडीसाठी येणाऱ्या खर्चापेक्षा या मशीनचा खर्च कमी असणार आहे. हे मशीन बॅटरीवर चालते. त्यामुळे शेतकऱ्यांचा इंधन खर्च वाचेल. एकदा चार्ज केल्यानंतर हे मशीन दोन ते तीन तास चालते.
advertisement
एकाच मशीनने तीन कामं
विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, या मशीनच्या मदतीने वखरणी, पेरणी आणि फवारणी ही तीन कामं होऊ शकतात. हे मशीन बनवण्यासाठी सुमारे 40 हजार रुपयापर्यंतचा खर्च आला आहे. नवीन स्टार्टअप म्हणून या मशीनचं जास्त उत्पादन केल्यास एक मशीन बनवण्याचा खर्च 20 हजार रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या मशीनमुळे बैलजोडी किंवा ट्रॅक्टरसाठी लागणारा खर्च कमी होणार आहे.
advertisement
विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी मशीनचं पेटंट देखील मिळवलं आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी बनवलेल्या या अनोख्या मशीनमुळे आता शेतकऱ्यांचं काम सोपं होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने शेतीची कामं केली जातात. काहीवेळा त्यासाठी मनुष्यबळाची देखील गरज भासते. त्यामुळे शेतकऱ्यांचा जास्त खर्च होतो. चेतन म्हेत्रे आणि त्याच्या मित्रांनी बनवलेलं मशीन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Farming Machine: शेतकरी पुत्रांची कमाल! एकाच मशीनने होणार तीन कामं, पेटंटही मिळवलं
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement