दादा, इथं कचऱ्याचा प्रश्न...
"दादा, इथं कचऱ्याचा प्रश्न आहे. रासने आणि धंगेकर यांना सांगून तेवढं करून द्या. खाली पण कचरा असतो," अशी तक्रार एका महिलेने केली. रासने आणि धंगेकरांचं नाव कळताच अजित पवार यांना देखील हसू आवरलं नाही. दुसरीकडे, एका महिलेने शहरातील गर्दी आणि वाहतूक कोंडीबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यावेळी, मी कवयित्री आहे, तुमच्यापर्यंत मी माझ्या कविता कशा पोहोचवू, असं सवाल ज्येष्ठ महिलेने अजितदादांना केला. त्यानंतर दादांनी कविता पोहचवण्याचा मार्ग सांगितला. या महिलेने अजितदादांच्या वाढदिवसावर देखील कविता केल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
दादांकडे वाहतूक व्यवस्थेबद्दल तक्रार
"शनिवार-रविवार शहरात फिरायला नको होते. एवढी लोक रस्त्यावर उतरतात. वरुण आम्हाला विचारतात, तुमचे वय झाले आहे, कशाला येता? मी म्हणते, येते म्हणून जगलीय!" हे ऐकून अजित पवार हसायला लागले. या महिलांनी पवारांकडे वाहतूक व्यवस्थेबद्दल देखील तक्रार केली.
मंत्रालयात बसून या गोष्टी समजत नाहीत
दरम्यान, शेखर सिंह यांची नाशिक मध्ये बदली झाली आहे. हर्डीकर यांनी आज मला पुणे मेट्रोने केलेल्या पुलाची पाहणी करायला या असं सांगितलं. अजित पवार यांनी आज सकाळी तानपुरा पुलाची पाहणी केली. अनेक मुद्दे याठिकाणी पाहणी मध्ये दिसून आले. अनेक नागरिकांनी या पुलाचे कौतुक केलं आहे, नदीचा भाग अधिक चांगला करावा असं सांगितलं. मंत्रालयात बसून या गोष्टी समजत नाहीत, राऊंड मारून पाहिल्या गोष्टी की नागरिकांचे प्रश्न कळतात, असं अजित पवार म्हणाले आहेत.