विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्या जाऊ शकते अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आता पार्थ पवार यांचं नाव चर्चेत आहे, यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
advertisement
जय पवार यांना उमेदवारी द्यायची की नाही, यावर जनतेची आणि त्या भागातील कार्यकर्त्यांची जी मागणी असेल ते करायला तयार आहे. मी सात ते आठ वेळा लढलो आहे, त्यामुळे मला त्यात इंटरेस्ट नाही, शेवटी पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल की कोणाला उमेदवारी द्यायला पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता जय पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
August 15, 2024 1:45 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Maharashtra politics : बारामतीत आणखी एका पवारांची होणार एंट्री, अजितदादा घेणार का एक्झिट?
