बारामतीच्या हॉटेलवर बैठक पार पडली
अंत्यविधी संपताच 4 महत्वाचे नेते बारामतीच्या हॉटेलवर जमले. तिथं त्यांची बैठक पार पडली. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ उपस्थित होते. त्यानंतर त्याच रात्री तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तातडीने मुंबईला आले. धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांचं नाव पुढं आणण्यात आलं. अजित पवारांचं अस्तिविसर्जन होण्याआधीच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली होती. याची कल्पना पवार कुटूंबियांना देण्यात आली नव्हती.
advertisement
तातडीने मुंबईला रवाना
सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर तिघेही तातडीने मुंबईला रवाना झाले. प्रतिभा पवार यांना याविषयी फोनवरून माहिती देण्यात आली होती. विलिनिकरणासाठी फक्त अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी इतर कुणीही तिथं नव्हतं. बाकी नेत्यांची इच्छा होती की, विलिनिकरण होऊ नये. पार्थ पवार देखील याच मताचे होते. पार्थ पवार यांनी खासगीमध्ये नाराजी व्यक्त केली होती, अशी माहिती देखील समोर आली आहे.
शपथविधी लवकरात लवकर व्हावा
दरम्यान, तातडीने शपथविधी करावा आणि सुनेत्रा पवार यांच्या सुत्रं दिली जावी, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शपथविधी लवकरात लवकर व्हावा यासाठी प्रयत्न केले, असं दिसतंय. अजित पवार गटातील नेत्यांना अस्तित्व टिकवण्यासाठी राष्ट्रवादीने एकत्र येणं परवडणारं नाही, याची कल्पना आली असावी. त्यामुळे पवार कुटूंबातील कटुता कमी होऊ नये, यासाठी प्रयत्न केले गेले का? हा देखील मोठा प्रश्न आहे.
