दरम्यान, सप्टेंबरपासून पुण्यातील या पुलाचे काम सुरू होते, आता लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतूकीमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील काही दिवसांत पुलाचे उरलेले काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण पूल वाहतुकीसाठी खुला होईल. या पुलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील महामेट्रोने केले आहे. दिवाळीच्या गर्दीमुळे आणि नागरिकांच्या सोयीसाठी पेठ आणि डेक्कन जिमखाना परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बाबा भिडे पूल सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत वाहनांसाठी खुला ठेवण्यात आला होता.
advertisement
परंतू तो आता आजपासून बंद करण्यात आला आहे. भिडे पूल बंद असताना नागरिकांनी संभाजी पूल, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल व काकासाहेब गाडगीळ पूल या पुलांचा वापर करून मेट्रो प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पुणे मेट्रोतर्फे करण्यात आले आहे. यापूर्वी सुद्धा महामेट्रोतर्फे प्रवाशांना या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
