ससून रुग्णालयात एका वॉर्डच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमस्थळीच झालेल्या या प्रकाराने सर्वजण चकीत झाले. भाषणावेळी अजित पवार यांनी आमदार सुनील कांबळे यांचा उल्लेख करत समजावून सांगितलं होतं. ससूनमध्ये नूतन इमारतीचं उद्घाटन सोहळा होता. ससून रुग्णालय सुनिल कांबळे यांच्या मतदारसंघात येते. अजित पवार भाषणात म्हणाले होते की, आम्ही तुमचंही सहकार्य घेऊ, सूचना लक्षात घेऊ.
advertisement
ससूनच्या उद्घाटन कोनशिलेवर नाव नसल्यानं याआधी त्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर आता पोलीस शिपायाला मारहाण केलीय. भाषण संपल्यानंतर सुनील कांबळे हे खाली उतरत होते. त्यावेळी त्यांनी बाजूला उभा असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला गालावर मारलं. त्यांच्या या कृतीमुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. भाजप आमदार सुनील आमदार यांनी पोलिसाला मारहाण केलीय. एका लोकप्रतिनीधीकडून अशी कृती केली गेल्यानं आता प्रश्न उपस्थित होतोय.
पोलीस शिपाई की हॉस्पिटलचे कर्मचारी हे अद्याप लक्षात आलेलं नाही. बाहेर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी वाद घातला. नाव दिलं होतं पण कुठून नाव काढलं गेलं हे माहिती नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर माध्यमांशी न बोलता ते निघून गेले. कार्यक्रमावेळी दोनदा त्यांनी मारहाण केलीय.
दरम्यान सुनील कांबळे यांनी माञ राष्ट्रवादी पदाधिकारी जितेंद्र सातव यांना मारहाणीचे आरोप फेटाळून लावलेत. संबंधित कर्मचाऱ्याला मी कानशिलात नाही मारली तर फक्त जीना उतरताना बाजुला ढकललं, असा दावा भाजप आमदार सुनील कांबळे यांनी केलाय.
