पुणे : आता सर्वत्र गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. गणपतीच्या सजावटीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. विविध प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्याने लोकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होती. यामध्ये फुल माळांपासून ते सजावटीच्या वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळत आहेत. सजावटीची आवड असणाऱ्यांसाठी गणपती उत्सव हा एक पर्वणीच असतो. या काळात सजावटीच्या नवनवीन साहित्याने बाजारपेठा अगदी खुलून गेलेल्या असतात.
advertisement
सगळीकडे सजावटीचे साहित्य फुल माळा, तोरण, लटकन अशा विविध गोष्टी या बाजारात उपलब्ध असल्याच पाहायला मिळत आहेत. या वस्तू होलसेलच्या दारात उपलब्ध आहे .यासाठी पुण्यातले असे कुठले मार्केट आहे, जिथे हे सजावटीचे फुल, साहित्य, वस्तू खरेदी करू शकतात. तर या विषयीची अधिक माहिती आपण घेऊयात.
रक्षांबधनाच्या औचित्यावर पुण्यात एक अनोखा उपक्रम, तुम्हीही कराल कौतुक, VIDEO
पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरातील भोरे आळी एन एक्स दिव्या पार्टी शॉप आहे. इथे जवळपास वेगवेगळ्या वस्तूच्या 200 हुन अधिक प्रकारच्या व्हरायटी पाहिला मिळतात. यामध्ये माळा आहेत यांच्या 50 ते 60 प्रकार आहेत. तर सिंगल माळ ही 60 रुपयांपासून सुरू होते. ती 300 रुपयांपर्यंत आहे. फुले ही 40 रुपयांपासून ते 120 रुपयांपर्यंत डझन मिळत आहे.
health tips in marathi : रात्री झोपण्यापूर्वी अजिबातच हे पदार्थ खाऊ नयेत, डॉक्टरांचं ऐकायला हवं
मोत्याचं तोरण, फुलांच्या माळा, पान लडी, झेंडू तसंच आर्टिफिशियल फुले आहेत. मोत्यांचे हार, तोरण, लटकन, झुंबर, पडदे अशा सजावटीचे विविध वस्तू इथे पाहिला मिळतात, अशी माहिती विक्रेते विनोद बंजारा यांनी दिली.
या वर्षी बाजारात फ्लॉवर विक्टोरीया ट्रेंडिंग आहे. तसेच मोत्याचं तोरण लटकन, फुलांचे पट्टी माळा, हार यातही खूप सारी व्हराइटी इथे तुम्हाला पाहायला मिळते. या वर्षी बाप्पाचे डेकोरेशन काही वेगळ्या पद्धतीने करायचं असेल तर तर या वस्तूंचा नक्कीच वापर करू शकता.