गाडी क्रमांक 01411 शनिवारी, दि. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी पुणे स्थानकावरून सुटणार आहे. ही गाडी 29 डिसेंबर रोजी पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी प्रयागराज येथे पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक 01499 बुधवारी, 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी पुण्याहून रवाना होऊन 2 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजून 10 मिनिटांनी प्रयागराज येथे दाखल होईल.
advertisement
थांबे कुठं?
या विशेष गाड्यांना हडपसर, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, गोविंदपुरी आणि फतेहपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक प्रवाशांना या गाड्यांचा लाभ घेता येणार आहे.
या गाड्यांमध्ये एकूण 20 आयसीएफ डबे असणार असून, त्यात 14 स्लीपर श्रेणीचे आरक्षित डबे, 4 स्लीपर श्रेणीचे अनारक्षित डबे तसेच 2 गार्ड/लगेज व्हॅनचा समावेश आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण 25 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही रेल्वेकडून करण्यात आले आहे.






