आंबेगाव तालुक्याच्या मंचर वनपरिक्षेत्रामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे, या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे. मात्र, आता चक्क बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्यात ठेवलेल्या सावजाचीच चोरी होऊ लागली आहे. या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. हे सर्व चित्र पाहून अधिकारीही हैराण झाले आहेत.
advertisement
Agriculture News : 300 अंडी देणारी कोंबडी, घरी येईल पैसेच पैसे, बेस्ट बिझनेस आयडिया!
आंबेगाव तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यातच आता ऊसतोड सुरू असल्याने अनेकांना दिवसाढवळ्या बिबटे दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे. त्यामुळे, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यात ठेवलेल्या सावजाचीच चोरी होण्याच्या घटना समोर येत असल्याने आता अधिकारीही हैराण झाले आहेत.
2 दिवसांपूर्वी अवसरी बुद्रुक इथल्या वरचा हिंगे मळा जाणाऱ्या रस्त्याजवळ वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. त्यात कोंबडी ठेवण्यात आली होती. पण अज्ञात चोरट्याने बिबट्या जेरबंद होण्याआधीच ती कोंबडी लंपास केली. याशिवाय जवळच असलेल्या गावडेवाडी या गावामध्ये, बैलगाडा घाटाजवळ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले आहेत.
