रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमधील नाराजी नाट्य समोर आलं आहे. काँग्रेसचे नेते आणि सात टर्म नगरसेवक असलेले आबा बागुल यांचं व्हॉटस अप स्टेटस समोर आलं आहे. 'पुण्यात निष्ठेची हत्या ' म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आबा बागुल हे देखील पुण्यातून काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र रवींद्र धंगेकर यांना तिकीट मिळाल्यानं आबा बागूल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
पुण्यात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता. तर दुसरीकडे या मतदारसंघातून भाजपच्या वतीनं मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात मोहोळ विरोधात धंगेकर असा सामान रंगणार आहे. मात्र दुसरीकडे धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.