TRENDING:

प्रवाशांसाठी खूशखबर! दौंड- निजामाबाद रेल्वेला 9 थांबे, कोल्हापूर-CSMT ट्रेनही इथं थांबणार

Last Updated:

Daund Nizamabad Railway: रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. दौंड निझामाबाद रेल्वेला 9 अतिरिक्त थांबे असणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : भारतीय रेल्वे ही सार्वजनिक वाहतुकीचं मोठ जाळं आहे. स्वस्तात आणि आरामदायी प्रवासासाठी अनेकांची रेल्वेला पसंती असते. दौंड-निजामाबाद गाडीला प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. आता याच मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने एक खूशखबर दिली आहे. दौंड निजामाबाद आणि निजामाबाद दौंड या गाड्यांना 9 ठिकाणी नव्याने थांबे दिले आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
प्रवाशांसाठी खूशखबर! दौंड- निजामाबाद रेल्वेला 9 थांबे, कोल्हापूर-सीएसएमटीही इथं थांबणार
प्रवाशांसाठी खूशखबर! दौंड- निजामाबाद रेल्वेला 9 थांबे, कोल्हापूर-सीएसएमटीही इथं थांबणार
advertisement

दौंड निजामाबाद एक्स्प्रेस ही लांब पल्ल्याची ट्रेन असून 698 किलोमीटरचं अंतर 18 तासांत पूर्ण करते. दौंड निजामाबाद (गाडी क्र. 11409) आणि निजामाबाद दौंड (गाडी क्र. 11410) या गाड्यांचे थांबे वाढवावेत अशी मागणी गेल्या काही काळापासून होत होती. त्यानुसार रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून आता या गाड्यांना 9 ठिकाणी नवे थांबे देण्यात आले आहेत. ही गाडी दौंडवरून निघाल्यानंतर काष्टी, बेलवंडी, रांजणगाव रोड, सारोळा, अकोळनेर, वैलाड, वंबोरी, पाडेगाव, चैताली या स्थानकांवर थांबणार आहे.

advertisement

Mumbai-Pune Expressway: बॅटरी संपली? चिंता नाही, एक्सप्रेसवेवर वाहन लगेच चार्ज; जाणून घ्या राज्य सरकाच प्लान काय?

या गाड्यांना जादा थांबा

दादर- साईनगर शिर्डी एक्स्प्रेस गाडीला (क्रमांक 11041 आणि 11042) राहुरी स्थानकावर, तर कोल्हापूर-सीएसएमटीदरम्यान धावणाऱ्या गाडीला (क्रमांक 11029 आणि 11030 ) वळीवडे येथे थांबा दिला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
प्रवाशांसाठी खूशखबर! दौंड- निजामाबाद रेल्वेला 9 थांबे, कोल्हापूर-CSMT ट्रेनही इथं थांबणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल