पुणे : आता सर्वत्र गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहे. या निमित्ताने बाजारपेठाही फुलून गेल्या आहेत. यंदा देखील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींना बाजारात चांगली मागणी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याचबाबत लोकल18 चा हा आढावा.
बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना मागणी वाढली आहे. त्यांच्या किमतीही शाडूच्या मूर्तीपेक्षा कमी असल्याने नागरिक त्याचीच खरेदी करत आहेत. यंदा बाजारात जवळपास 80 टक्के पीओपी, 15 टक्के शाडू माती आणि 5 टक्के कागदी लगद्यापासून तयार केलेल्या घरगुती गणेशमूर्ती आहेत.
advertisement
पीओपीपासून तयार केलेली गणेशमूर्ती हाताळणे सूकर होते. शाडू मातीपासून तयार केलेली गणेशमूर्ती अत्यंत जपावी लागते. शहरातून बाहेरगावी गणेशमूर्ती नेत असताना रस्त्यात खड्डे असल्यामुळे मूर्तीला हादरे बसतात. मात्र, ‘पीओपी’ गणेशमूर्तीचा भंग होत नाही. शाडू मातीच्या मूर्तीपेक्षा पीओपीची गणेशमूर्ती ही वजनाने हलकी आणि मजबूत असते. त्यामुळे यंदाही नागरिकांचा पीओपीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती घेण्याकडे कल आहे, अशी माहिती मूर्ती विक्रेते अंकुश गोलांडे यांनी दिली.
सण, उत्सवात घुंगरू कडीला विशेष मागणी, मुंबईतील या मार्केटमध्ये मिळते फक्त 50 रुपयात, VIDEO
बाजारात वृक्षगजानन या संकल्पनेच्या मुर्तीही बाजारपेठेत आल्या आहेत. तसेच बालगणपती, राम अवतारातील गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, डमरू वाजवणारा गणपती, महादेव वेशातील गणपती असे अनेक प्रकारचे गणपती विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. बाजारपेठेत सध्या 2 फुटी गणपतीला मोठी मागणी आहे.
निसर्गाचा अद्भुत आविष्कार, साताऱ्यात पसरली पांढरी शुभ्र धुक्याची चादर, सुंदर अशी अनुभूती, VIDEO
शाडूचे गणपती हे पाण्यात विरघळतात. मात्र, तयार होणारा मातीचा गोळा हा इतर मातीत मिसळत नसून त्यात आपण झाडे सुद्धा लावू शकत नाही. तसेच या गणपतीची किंमत 911 रुपयांपासून ते 15 हजार रुपयांपर्यंत आहे, असे मूर्ती विक्रेत्यांनी म्हटले आहे.