क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक
या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांचा विजय निश्चित करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फडणवीस यांनी मतदारांची म्हणजेच विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक स्वतंत्र बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी मोहोळ यांच्या बाजूने जोरदार लॉबिंग केल्याची चर्चा आहे. अजित पवार हे सलग तीन टर्म या संघटनेचे अध्यक्ष राहिले आहेत आणि आता चौथ्यांदा त्यांनी अर्ज दाखल केला आहे.
advertisement
बुस्टर देण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. येत्या 2 नोव्हेंबर रोजी मुंबईत या पदासाठी मतदान होणार असल्याने आता मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार तयारी केली आहे. जैन मंदिराच्या जागेवरून झालेल्या वादामुळे मोहोळ यांची प्रतिमा खालावली होती. त्याला आता बुस्टर देण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात उतरले आहेत.
महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान - रामदास तडस
दरम्यान, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (Maharashtra Olympic Association Election) अध्यक्षपदासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तसेच माजी कुस्तीपटू मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट सामना रंगणार आहे. अजित पवारांच्या मागील तीन टर्ममध्ये महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. अजित पवार यांच्या समितीने महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या खर्चाचा हिशोब दिलेला नाही, असा गंभीर आरोप रामदास तडस यांनी केले होते. त्यानंतर आता भाजपने आक्रमक तयारी सुरू केली आहे.
