TRENDING:

दिवाळीसाठी पुण्याहून गावी जाताय? स्वस्तात प्रवासाचे उत्तम पर्याय माहितीये का? Video

Last Updated:

पुण्यात कामानिमित्त आलेले अनेकजण दिवाळीला आपल्या गावी जातात. रेल्वे फूल्ल असताना प्रवासाचा उत्तम पर्याय कोणता? इथं पाहा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, 9 नोव्हेंबर: दिवाळी सण हा उत्साह, आनंद, प्रेम, आपुलकी देणारा सण आहे. हा सण साजरा करण्यासाठी प्रत्येकाला आपल्या घराची ओढ लागलेली असते. काही कामानिमित्ताने असो किंवा इतर कुठल्या कारणाने अनेकजण मूळ गाव सोडून बाहेर राहतात. पण दिवाळीसाठी प्रत्येकालाच आपल्या गावी जायचं असतं. या प्रवासासाठी लोक रेल्वे आणि एसटी बसचा पर्याय निवडतात. पण दिवाळीत याचे रिजेर्वेशन फुल्ल होते. तेव्हा इतर कुठले पर्याय उपलब्ध आहेत? हे माहिती असणं गरजेचं असतं. दिवाळीत पुण्यातून बाहेरगावी जाण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
advertisement

कुठल्या गाड्यांसाठी किती दर ?

महाराष्ट्रातील गाड्यांचे पर्याय अनेक आहेत. यामध्ये 4 सीटर ते 6 सीटर हे ऑप्शन आहेत. तसं बघायला गेलं की रेल्वे आणि विमानाचे तिकीट दर आणि खासगी वाहनांचे दर हे जवळपास सारखेच पडतात. फोरव्हिलर, ट्रॅव्हल्स असे पर्याय आहेत. तसेच स्लीपर गाड्या, मिनी बस आहेत. 4 सीटर गाड्या हे 12 ते 13 रुपये प्रति किलोमीटरने चालतात. दुसरा पर्याय एसयूव्हीचा तर त्याचे दर 17 ते 20 रुपये प्रति किलोमीटर आहेत. मिनी बसमध्येही काही ऑप्शन येतात. 9 सीटर ते 20 सीटर या पर्यायात 20 रुपये पासून ते 30 रुपये पर्यंत दर जातो. तसेच बसमध्येही 2 बाय 2 50 सीटर गाड्या आहेत त्याचा दर 40 ते 50 रुपये प्रति किलोमीटर जातो, अशी माहिती बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक संदीप खारकर यांनी दिली.

advertisement

मराठा विद्यार्थ्यांना मोठी संधी, सारथी शिष्यवृत्तीचा लाभ कसा घ्यायचा माहितीये का?

View More

दिवाळीच्या काळात तिकीटांचे दर हे 700 ते 1 हजार किलोमीटरसाठी अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत असतात. पण याच्यापेक्षा कमी अंतर असेल तर हे दर 1 ते दीड हजार रुपयांपर्यंत असतात, असेही संदीप खारकर सांगतात. तसेच खासगी वाहनांचे अनेक पर्याय या प्रवासासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे रेल्वेचे तिकीट कन्फर्म होत नसेल किंवा इतर पर्याय उपलब्ध होत नसेल तर खासगी वाहनांद्वारे आरामदायी प्रवास करता येतो. त्यांचा वापर प्रवाशांनी करावा, असेही आवाहन खारकर करतात.

advertisement

कुठून मिळतील गाड्या?

सर्व गाड्या या निगडी, संगमवाडी या ठिकाणाहून जातात. तर काही नवले ब्रिज कात्रज मार्गे जातात. नांदेड, परभणी, त्या साईटला जाणाऱ्या गाड्या या कात्रज पद्मावती मार्गे सोलापूर कडून जातात. नगर, औरंगाबाद, नाशिक साईटला जाणाऱ्या बसेस संगमवाडी किंवा निगडी कडून जातात.

मराठी बातम्या/पुणे/
दिवाळीसाठी पुण्याहून गावी जाताय? स्वस्तात प्रवासाचे उत्तम पर्याय माहितीये का? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल