मराठा विद्यार्थ्यांना मोठी संधी, सारथी शिष्यवृत्तीचा लाभ कसा घ्यायचा माहितीये का?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सारथी संस्थेकडून शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. काय आहे प्रक्रिया ? इथं पाहा.
पुणे, 9 नोव्हेंबर: मराठा समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी महाराष्ट्र सरकारने पुण्यात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे ही स्वायत्त संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या वतीने मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीही देण्यात येतात. 9 वी ते 11 वीच्या विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती दिली जाते. आता 2023- 24 या शैक्षणिक वर्षासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सारथी शिष्यवृत्ती घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे? याविषयी संपूर्ण माहिती 'सारथी'चे व्यवस्थापकीय संचालकअशोक काकडे यांच्याकडून जाणून घेऊया.
सारथी शिष्यवृत्ती काय आहे?
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता नववी, दहावी,अकरावी या वर्गातील मराठा, कुणबी, कुणबी -मराठा व मराठा- कुणबी या गटातील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात प्रतिमाह 800 रुपये प्रमाणे वर्षाला 9 हजार सहाशे रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. मराठा व कुणबी समाजातील आर्थिक परिस्थिती दुर्बल असणाऱ्या होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
advertisement
काय आहे पात्रता?
सारथी शिष्यवृत्ती 2023-24 चा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा इयत्ता 9वी, इयत्ता 10वी व इयत्ता 11वी या वर्गात शिक्षण घेत असावा. या शिष्यवृत्तीचा लाभ मराठा, कुणबी, मराठा–कुणबी व कुणबी–मराठा या चार गटातील विद्यार्थी घेऊ शकतात. राज्यातील सर्व शासकीय, शासनमान्य, अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत जी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असे विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती करता पात्र आहेत. NMMS ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अपात्र असलेल्या व इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती पात्र समजण्यात येईल.
advertisement
इयत्ता दहावी मध्ये नियमित शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता नववी मध्ये 55 टक्के गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इयत्ता आकरावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी मध्ये 60 गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इयत्ता नववी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असावे. इयत्ता दहावी व आकरावी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असावे.
advertisement
कोण ठरेल अपात्र?
1. विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच स्वयं अर्थसहाय्यित शाळेतील विद्यार्थी व ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थी
2. केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
3. जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
4. शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी.
5. सैनिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.
advertisement
कुठे कराल अर्ज?
1. शाळा स्तरावर अर्ज भरून कागदपत्रांसह गट शिक्षणाधिकारी कार्यालय येथे जमा करणे व ऑनलाईन लिंक वर माहिती भरता येते.
2. गट शिक्षणाधिकारी यांनी तालुका स्तरावर अर्जाची छाननी व पडताळणी केलेले अर्ज माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सादर करावे.
3. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सर्व अर्ज मा. व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी पुणे, महाराष्ट्र 411004 या पत्त्यावर सादर करावे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 09, 2023 12:57 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
मराठा विद्यार्थ्यांना मोठी संधी, सारथी शिष्यवृत्तीचा लाभ कसा घ्यायचा माहितीये का?

