पंचगव्य स्नानातून आरोग्य संवर्धन; दिवाळीनिमीत्त खास आयोजन Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
हे पंचगव्य स्नान दिवाळी संपेपर्यंत चालणार आहे.
पुणे, 7 नोव्हेंबर : शरीरशास्त्र हा मोठा रंजक विषय आहे. शरीराची हौस पुरविण्यासाठी अनादी काळापासून नाक, कानाला वेदनादायी छिद्र पाडण्यापासून तर अंगावर गोंदण आणि अलिकडे टॅट्यु काढण्यापर्यंत कला जोपासल्या जात आहेत. आधुनिक काळात शरीर स्वच्छतेसाठी साबणापासून तर विविध प्रकारच्या शांपू आणि परफ्युम पर्यंत नानाविध साहित्य उपलब्ध आहे. मात्र, आधुनिक लाईफ स्टाईलच्या युगातील नवनवीन साधन नाकारुन पारंपारिक जीवनशैलीने शरीर स्वच्छता आणि संवर्धन करणारा एक वर्ग आहे. विशेष म्हणजे यात नवीन पिढीतील चिमुरड्यांचा समावेश आहे. याची प्रचिती पिंपरी चिंचवड शहरातील पंचगव्य शाही स्नानामध्ये पाहिला मिळत आहे.
दिवाळीला आकर्षक रांगोळीनं सजवा अंगण, झटपट काढता येतील या 5 डिझाईन
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पांजरपोळ येथे महाराष्ट्र गोसेवा समिती आणि देशी गोवंश कल्याण समितीच्या वतीने दिवाळीनिमित्त पंचगव्य शाही स्नानचे आयोजन करण्यात आलंय. हे पंचगव्य स्नान दिवाळी संपेपर्यंत चालणार आहे. या शाही स्नानात हजारोंच्या संख्येनं लहान मुले, तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी देखील सहभाग घेतल्याचे पाहिला मिळत आहे.
advertisement
पंचगव्य स्नान नेमकं काय ?
view commentsया पंचगव्य स्नानामध्ये प्रामुख्याने गाईचे शेण, गोवऱ्याची राख, दही, तूप, गुलाब पाणी, तुळशीपत्र, जास्वंद, गोमूत्र, कोरफड, लिंबू , मध, हळद आणि कडुनिंब यांचा मिश्रण करून त्याचं लेप अंगावर लावला जातो आणि सूर्यप्रकाशात काही वेळ बसून नंतर अंघोळ केली जाते. परंमपरागत चालत आलेले हे स्नान असून त्याला वैज्ञानिक आधार देखील आहे. या पंचगव्य स्नानातून अनेक त्वचेचे विकार नष्ट होतात, अशी माहिती सहभागी नागरिकांनी दिलीय.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 07, 2023 6:28 PM IST

