पुणे : सध्या आषाढी एकादशीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. अनेक शेतकरी बांधव शेतीमधील कामं आटपून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल झालेली आहेत. अशातच काही शेतकऱ्यांनी पिकाला योग्य दर मिळावा, यासाठी पांडुरंगाकडे अनोख्या पद्धतीने साकडं घातलं आहे. यां आगळ्या वेगळ्या पद्धतीची सर्वत्र चर्चा सगळीकडे सुरू आहे.
नेमका काय आहे हा प्रकार -
advertisement
अशातच शेतकरी हा आपल्या शेतात खुप राबतो. काबाडकष्ट करतो. मात्र, तरीही त्याला योग्य तो मोबदला मिळत नाही. पिकवलेल्या पिकांचेही अनेकदा नुकसान होते. त्याची भरपाईसुद्धा काही वेळा शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून पांडुरंगाचा निस्सीम भक्त आहे. तोच पोशिंदा उपाशी राहू नये असं मागणं यावेळी पांडुरंगाकडे मागण्यात आलं.
आषाढीनिमित्त शेतकरी-वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी हा अनोखा प्रकार पाहायला मिळाला. हातात कांदा, सोयाबीन, कापूस तसेच दूध घेऊन संतांच्या पालख्यांना तसेच पांडुरंगाला हे साकडं घालण्यात आलं. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा, यासाठी हे अशा अनोख्या पद्धतीने साकडं घालण्यात आलं. यावेळी अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. मालाला योग्य दर मिळावा यासाठी हे साकडं घालतं असल्याचं शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात? अनेकांना माहिती नसेल, हे आहे विशेष कारण
काळीभोर माती आणि तसाच पांडुरंग असतो म्हणून शेतकऱ्यांना पांडुरंग आवडू लागतो, रानात आजही प्रत्यक्ष राबत असल्यामुळे शेतकऱ्याचे मातीशी आणि पांडुरंगाशी आत्मिक नाते अबाधित आहे. शेतकऱ्यांचं पांडुरंग ऐकतो, असं म्हणतात आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी पांडुरंगकडे साकडे घालण्यात आले. त्यामुळे वारीचा अनुभव आणि आनंदाची बचत शेतकऱ्यांचे आयुष्य समृद्ध करेल, अशा असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.





