पुणे : देशभरात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. पुण्यातही कृष्ण भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच पुण्यात इस्कॉन मंदिरही आहे. कृष्ण भक्त याठिकाणी भेट देतात. दररोज या ठिकाणी कृष्ण सेवा केली जाते. तसेच भगवद्गीतेचे वाचन देखील केले जाते. याच पुण्यातील इस्कॉन मंदिरात मोठ्या उत्साहात गोपाळकाल्याचा उत्सव साजरा करण्यात आला.
advertisement
यावेळी रावेत येथील इस्कॉन मंदिर हे कृष्ण भक्तांनी गजबजल असल्याचे पाहायला मिळाले. गोपाळकाला निमित्त या मंदिरात अनेक भाविक भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रात्री 12 पासून ते पहाटे 5 पर्यंत कार्यक्रम यावेळी झाले. 'हरे कृष्ण' महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद भागवत प्रवचनही याठिकाणी झाले.
श्रीकृष्णाच्या विविध लीला प्रदर्शित करणारी लघुनाट्ये, दिवसभर कीर्तन, भजन झाले. मंदिरात 24 तास अखंड हरिनाम संकीर्तन पार पडले. सुमारे एक हजार भाविकांनी सायंकाळी श्री राधा-कृष्णांच्या विग्रहाचा पंचामृताने अभिषेक केला. रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णास महाआरती व महाभोग अर्पण केला.
कबड्डीची तालीम करत दहीहंडी पथक सुरू; मुंबईतील डॉक्टर, पोलीस विवाहित महिलांच्या जिद्दीची कहाणी, VIDEO
तत्पूर्वी भगवान श्रीकृष्णांना सायंकाळी सुमारे एक हजार 008 पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. श्री कृष्णांचे चरित्र या विषयावर त्यांची प्रवचनमाला झाली, अशी माहिती मंदिर कमिटीचे व्यवस्थापक यांनी दिली. इस्कॉन मंदिरातर्फे भाविकांसाठी 3 दिवसीय गीता प्रशिक्षणाचे आयोजन याठिकाणी करण्यात आले होतो. दही हंडीचा उत्सव देखील या ठिकाणी भक्तांच्या उपस्थितीत पार पडला.
मुंबईत याठिकाणी महिलांना मिळाला हंडी फोडण्याचा मान, मंदिराचा इतिहासही अनोखा, VIDEO
मंदिरात दर्शनासाठी लोकप्रतिनिधींनीही हजेरी लावली. शहरासह नजीकच्या ग्रामीण भागातूनही भाविक उपस्थित होते. विविध आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन, व त्याची विक्रीही याठिकाणी झाली. अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी सांभाळली. या उत्सवानिमित्त झालेल्या महाप्रसादाचा सुमारे 25 हजार भाविकांनी लाभ घेतला, असे सांगण्यात आले.