दसरा आणि दिवाळी सणाच्या काळात वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे अनेक नागरिक या काळात वाहन खरेदी करतात. वाहनांची किंमती कमी झाल्यामुळे यावर्षी ग्राहकांकडून वाहन खरेदीत मोठी वाढ झाली आहे. या कालावधीत 2,727 नवीन परवाने जारी झाले, विशेषत: दुचाकी आणि कार खरेदीला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला.
इलेक्ट्रिक वाहनांना पसंती
इलेक्ट्रिक वाहनांवर फक्त 5% जीएसटी लागू असल्यामुळे नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहन खरेदीला विशेष प्राधान्य दिले आहे. या काळात 1,403 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. याबरोबरच, सर्वाधिक 14,371 पेट्रोल वाहनांची, तर 2,451 डिझेल वाहनांची खरेदी नोंद झाली आहे. तसेच, पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही असलेल्या 2,594 वाहनांची आणि फक्त सीएनजी असलेल्या 821 वाहनांची विक्रीही झाली.
advertisement
आरटीओ मालामाल, कोट्यावधींचा महसूल जमा
वाहन नोंदणी आणि परवाण्यांमुळे पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा महसूल 113 कोटी 70 लाखांपर्यंत पोहोचला आहे. जीएसटी कपातीमुळेही आरटीओला मोठा फायदा झाला असून, या काळात महसूलात लक्षणीय वाढ दिसून आली आहे. पिंपरी- चिंचवड आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल आशय यांनी सांगितले की, दसरा आणि दिवाळीच्या काळात वाहन खरेदी करण्याची परंपरा आहे. वाहन खरेदी केल्यानंतर आता विक्रेत्यांकडून वाहनांची नोंदणी आणि पथकर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. जीएसटी कपातीमुळे वाहनांच्या नोंदणीत लक्षणीय वाढ दिसून आली आहे.
