पुणे : पुणे शहरात गुरुवारी पावसाने चांगलाच कहर केला. या पावसामुळे पुण्यातील नागरिकांचे मोठे हाल झाले. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याचे पाहायला मिळाले. अनेक लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी गेले. यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले. या पावसामुळे सिहंगड वरील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर एनडीआरएफची टीम पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी कार्यरत आहे.
advertisement
पुण्यात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, पहाटे चार वाजेपासून वस्त्यांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली होती. यानंतर सात वाजेपर्यंत घरांमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. एकता नगरमध्ये डोक्याएवढं पाणी यापूर्वी कधीच आलं नव्हतं. घरातील धान्य वगैरे सगळेच भिजलं. तसेच आता झोपायचे कसे, हा प्रश्नही निर्माण झाला आहे. अशा या परिस्थितीत सोसायटीमधील लोकंही सहकार्य करत आहेत.
पालकमंत्र्यांनी घेतला आढावा -
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील इथे येऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सहकार्य व मदत मिळेल, अशी आशा आता येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पावसाने दाणादाण, खाकी वर्दीही उतरली बचावासाठी पाण्यात -
या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दैना झाली. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. महापालिकेच्या शाळेत जाऊन स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांची विचारपूस केली आहे. तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात अतिवृष्टी ग्रस्त भागात जाऊन नागरिकांना पाण्यातून बाहेर काढला आहे.
राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले, कोल्हापुरात पुन्हा येणार महापूर?, VIDEO समोर
पूरग्रस्त घरातील नागरिकांना बाहेर निघण्याच आव्हान देखील केला आहे. वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी स्वतः काळेवाडी भागातील इंडीयन कॉलनी मध्ये जाऊन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केला आहे.