ठाण्यातही मुसळधार, टिटवाळ्यात काळु नदीला पूर, चाळींमध्ये शिरलं पाणी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
काल रात्रीपासूनच मुंबई आणि ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाण्यासोबतच कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा या परिसरात पावसाने हाहाकार केला आहे. टिटवाळ्यातली परिस्थिती काहीशी बिकट झाली आहे. टिटवाळ्यात मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस होत आहे.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : राज्यात पुणे, मुंबईसह इतर ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. यासोबतच काल मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे टिटवाळ्यातील काळू नदीला पूर आलेला आहे. या पुरामुळे नागरिकांच्या चाळींमध्ये पाणी शिरले आहे. या सर्व परिस्थितीमुळे टिटवाळ्यातील सगळेच लोक भयभीत झालेले आहेत. पुढील 2 ते 3 तास पाऊस असाच राहिला तर पुढे नेमकं कसं होणार, हा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे.
advertisement
काल रात्रीपासूनच मुंबई आणि ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाण्यासोबतच कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा या परिसरात पावसाने हाहाकार केला आहे. टिटवाळ्यातली परिस्थिती काहीशी बिकट झाली आहे. टिटवाळ्यात मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस होत आहे.
कोल्हापुराला पूराचा धोका?, पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, रस्त्यावर आले पाणी VIDEO
टिटवाळ्यातील मांडा वेस्ट या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या परिसरात पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण आहे. आजूबाजूला पाणी साठल्यामुळे ते पाणी कधीही आपल्या घरात शिरण्याची शक्यता आहे, अशी भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीत नागरिकांनी आपल्या घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
advertisement
मुख्यमंत्र्यांनी दिला नागरिकांना धीर -
मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे, मात्र जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत, ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरू आहे. काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मी करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
advertisement
एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
July 25, 2024 1:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
ठाण्यातही मुसळधार, टिटवाळ्यात काळु नदीला पूर, चाळींमध्ये शिरलं पाणी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, VIDEO