नैसर्गिक प्रवाहांचे उल्लंघन
या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) तातडीने पाऊल उचलले. त्यांनी एका खासगी सल्लागार संस्थेद्वारे आयटी पार्कमधील नैसर्गिक जलप्रवाहांचे ड्रोन सर्वेक्षण करून घेतले. या सर्वेक्षणामध्ये, परिसरातील नैसर्गिक पाणी वाहून नेणाऱ्या प्रवाहांच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे आणि ते प्रवाह बुजवले किंवा वळवले गेल्यामुळेच पूर येत असल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
सल्लागार संस्थेने तयार केलेला हा सविस्तर अहवाल आयआयटी मुंबईकडे मूल्यमापनासाठी पाठवण्यात आला होता. आता तो अंतिम अहवाल एमआयडीसीकडे सादर झाला आहे.
सोळा मजली खोल बोगदा, 700 इमारती खालून नवा मार्ग, मुंबईत गेम चेंजर प्लॅन!
१२५ कोटींचा उपाययोजना आराखडा
एमआयडीसीने या पूरस्थितीवर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी तब्बल १२५ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार, दोन टप्प्यांमध्ये कामे केली जाणार आहेत:
भूमिगत नाल्यांचे जाळे: आयटी पार्कमध्ये १७.५ किलोमीटर लांबीचे पावसाळी वाहिन्यांचे जाळे उभारले जाणार आहे.
भुयारी काँक्रीट नाले: विप्रो सर्कल ते सेझ सर्कल यासारख्या ज्या रस्त्यांवर पाणी मोठ्या प्रमाणात साचते, अशा ठिकाणी काँक्रीटचे भुयारी नाले बांधले जातील. यामुळे रस्त्यावर न साचता पाणी थेट या नाल्यांमधून वाहत जाऊन पुढे नदीला मिळेल.
स्वतंत्र नाले: डोंगरउतारावरून येणारे जलप्रवाह काही ठिकाणी रोखण्यात आले आहेत. त्या ठिकाणी स्वतंत्र नैसर्गिक नाले बांधले जातील, जेणेकरून हे पाणी थेट नदीपर्यंत पोहोचेल.
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला यांनी सांगितलं की, पहिल्या टप्प्यात भुयारी नाले बांधले जातील, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात डोंगरउतारावरील पाण्यासाठी स्वतंत्र नाला बांधण्यात येईल. यामुळे हिंजवडीतील पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होईल, अशी अपेक्षा आहे.
