सोळा मजली खोल बोगदा, 700 इमारती खालून नवा मार्ग, मुंबईत गेम चेंजर प्लॅन!
Last Updated:
orange gate marine drive underground road tunnel Project : मुंबईकरांची अखेर वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे. कारण पहिल्यांदा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चला जाणून घेऊयात नक्की कोणता गेमचेंजर निर्णय घेण्यात आलेला आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मुंबईतील एका अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पाचा शुभारंभ केला आहे. हा प्रकल्प म्हणजे 'ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह' दरम्यान जमिनीखालून जाणारा एक भव्य बोगदा असणार आहे. चला तर जाणून घेऊयात या नव्या प्रकल्पामुळे भविष्यात नागरिकांना कसा याचा फायदा होईल शिवाय यामुळे कोणते अंतर कमी होईल,
मुंबईतील वाहतूक कोंडी संपवण्यासाठी मोठा निर्णय
हा बोगदा सुमारे 5 किलोमीटर लांबीचा असेल आणि तो ईस्टर्न फ्रीवे आणि कोस्टल रोड यांना जोडेल. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल. हा बोगदा साधारण 16 मजली उंच इमारतीइतका (सुमारे 52मीटर) जमिनीखाली असेल. विशेष म्हणजे हा बोगदा जमिनीवरील 700 हून अधिक इमारतींच्याही खालून जाणार आहे,ज्यामुळे वरच्या रहिवाशांना कोणतीही अडचण येणार नाही. मुंबई मेट्रो-3 च्या बोगद्याच्याही खाली जाऊन हे काम केले जाईल.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाला देशासाठी एक अभियांत्रिकी चमत्कार म्हटले आहे. कारण इतक्या मोठ्या शहरात शिवाय इतक्या खोलवर आणि इतक्या इमारतींखाली बोगदा तयार करणे हे खरंच मोठे आणि कठीण काम आहे.
या बोगद्यामुळे होणारे फायदे?
1)वाहतूक कोंडीतून सुटका: पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईत येणाऱ्या गाड्यांना आता पुढे जास्त ट्रॅफिकमध्ये अडकावे लागणार नाही.
advertisement
2)प्रवास सोपा: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी आता दक्षिण आणि पश्चिम मुंबईतील लोकांना शॉर्टकट मिळेल, ज्यामुळे त्यांचा वेळ वाचेल.
या बोगद्याचे प्रत्यक्ष भुयारीकरण म्हणजेच खोदकाम 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. एमएमआरडीएने हे काम 36 महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या उद्घाटनावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते आणि एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. हा प्रकल्प मुंबईचे भविष्य अधिक वेगवान आणि सोपे बनवेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 10:09 AM IST


