अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासोबत राज्यातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं असलेलं अर्थखात्यासह राज्याचं उपमुख्यमंत्रीपदही होतं, दादांकडं असलेलं उपमुख्यमंत्री पद आणि महत्वाची खाती कुणाकडे सोपवलं जाणार याची चर्चा सुरू झालीय. अशातच अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद करण्याची मागणी सुरू झाली. अखेर बारामतीच्या सहयोग सोसायटी अजित पवरांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी होकार दिला आहे.
advertisement
कोणासोबत झाली बैठक?
बारामतीत अजित पवारांच्या अस्थिविसर्जनानंतर सुनेत्रा पवार, मुलगा जय पवार, पार्थ पवार आणि रणनीतीकार नरेश अरोरा यांची बैठक झाली. सुनेत्रा पवारांनी होकार दिल्यानंतर त्यांचा निरोप घेऊन नरेश अरोरा हे मुंबईकडे रवाना झाले आहे. उद्याच त्यांचा शपथविधी पार पडण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुशंगाने शपथविधीची तयारी झाल्याची देखील माहिती आहे.
सुनेत्रा पवार राजकारण कधीपासून सक्रिय?
सुनेत्रा पवारांसाठी राजकारण काही नवीन नाही. सक्रीय राजकारणात येऊन त्यांना उणे पुरे दिड वर्ष झाले आहेत. 2024 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. पण पक्षाचं राजकारणाची सगळी सूत्र हे अजितदादांच्या हाती होती. पण आता पक्षाच्या दृष्टीनं सुनेत्रा पवारांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. मुख्यमंत्रीपदानंतर राज्याचं उपमुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं पद आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांना राज्याचं उपमुख्यमंत्री दिलं आहे.
