TRENDING:

Pooja Khedkar : मोठी बातमी! अटकेच्या भीतीनं पूजा खेडकर दुबईला पळाली? पोलिसांकडून शोध सुरू

Last Updated:

Pooja Khedkar Update : बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानं ती दुबईला पळाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, वैभव सोनवणे प्रतिनिधी : बडतर्फ आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्लीतच असलेली पूजा खेडकर आता दुबईला पळाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. पूजा खेडकर अटकेच्या भीतीनं दुबईला पळाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिली आणि पुणे पोलीस तिच्या मागावर होते. आता दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकरचा शोध सुरू आहे.
News18
News18
advertisement

बडतर्फ IAS पूजा खेडकर यांचे आणखी 7 प्रताप

दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे पूजा खेडकर यांनी तब्बल सात वेळा आपल्या नावात फेरफार करून यूपीएससीची परीक्षा दिल्याचं समोर आलं आहे. इंग्रजी भाषेमधून नाव देताना पूजा खेडकर यांनी अनेक वेळा त्यांच्या स्वतःच्या नावाचे स्पेलिंग बदलून हा सगळा प्रकार केल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासातून आता समोर आले आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

advertisement

बडतर्फ IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठं ट्विस्ट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षेसाठी त्यांचं नाव लिहिताना सातवेळा फेरफार केल्याचं उघडकीस आलं आहे. इतकंच नव्हे तर पूजा खेडकर यांनी वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केल्याचं समोर आला आहे. पूजा खेडकर यांचा जामीन अर्ज देखील न्यायालयानं फेटाळला आहे. पूजा खेडकर यांचे एक एक कारनामे समोर येत असल्यानं आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pooja Khedkar : मोठी बातमी! अटकेच्या भीतीनं पूजा खेडकर दुबईला पळाली? पोलिसांकडून शोध सुरू
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल