Pooja Khedkar : बडतर्फ IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठं ट्विस्ट; सगळीकडं झोल, मात्र इथे मॅडमच खऱ्या ठरल्या!
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे, वायसीएम रुग्णालयाकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.
पुणे, गोविंद वाकडे, प्रतिनिधी : वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. युपीएससीकडून देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान दुसरीकडे मात्र आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे. पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून मिळवलेला अपंगत्वाचा दाखला खरा असल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्व तांत्रिक बाबी पडताळून आणि नियमानुसारच पूजा खेडकर यांना अपंगत्वाचा दाखला दिला असल्याचा दावा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी चौकशी अहवालत केला आहे.
वादग्रस्त बडतर्फ आयएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून मिळवलेला अपंगत्वाचा दाखला खरा असून , सर्व तांत्रिक बाबी पडताळून आणि नियमानुसारच तो दिला गेला आहे. दाखल्या संदर्भात करण्यात आलेल्या चौकशीमध्ये वायसीएम सर्व कर्मचारी निर्दोष असल्याचा खुलासा करत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयकडे पाठवला आहे.
advertisement
पूजा खेडकर यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्यात 7 टक्के अपंगत्व असल्याचा दाखला त्यांना देण्यात आला होता, मात्र वायसीएमकडून देण्यात आलेल्या दाखल्याचा कोणत्याही शासकीय किंवा खासगी संस्थेच्या नोकरीसाठी उपयोग होऊ शकत नाही ,असं देखील खुलाशात त्यांनी नमूद केलं आहे.
मात्र असं असलं तरी डॉक्टर वाबळे यांनी पूजा खेडकर यांना अपंगत्व दाखला देण्याआधी कोणकोणत्या शारीरिक तपासण्या करण्यात आल्या होत्या आणि त्या योग्य तज्ज्ञाकडून केल्या गेल्या होत्या का? या संदर्भात दिलेल्या माहितीची पुन्हा एकदा जिल्हा शल्य चिकित्सकाडून तपासणी केली जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
Aug 01, 2024 12:41 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pooja Khedkar : बडतर्फ IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठं ट्विस्ट; सगळीकडं झोल, मात्र इथे मॅडमच खऱ्या ठरल्या!










