यावर्षी आयसीएसईची परीक्षा सुमारे 2 लाख 60 हजारांहून अधिक, तर आयएससीची परीक्षा सुमारे दीड लाखांहून अधिक विद्यार्थी देणार आहेत. आयसीएसईच्या 75 विषयांची आणि आयएससीच्या 50 विषयांची परीक्षा होणार आहे. सीआयएससीईचे मुख्य कार्यकारी आणि सचिव डॉ. जोसेफ इमॅन्युअल यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण होऊ नये आणि ते अधिक चांगली कामगिरी करू शकतील, यानुसार वेळापत्रक आखण्यात आले आहे.
advertisement
भारतासह विविध देशांमधील जवळपास 3,200 शाळा सीआयएससीईशी संलग्न आहेत. या शाळांमधून सुमारे 35 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच, या शाळांमधून जवळपास दीड लाख शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.
सीआयएससीईच्या परीक्षेचे वेळापत्रक
आयसीएसई (दहावी) : 17 फेब्रुवारी ते 30 मार्च 2026
आयएससी (बारावी) : 12 फेब्रुवारी ते 6 एप्रिल 2026
सीआयएससीईच्या आयसीएसई आणि आयएससी या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.






