आर्थिक वादातून प्राणघातक हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश ऊर्फ बंटी भवरसिंग राजपूत याच्यासह ८ ते ९ आरोपी मोटारसायकलींवरून आले. त्यांनी कारचालक अशोककुमार सिंग यांना शिवीगाळ करत "तुला आणि तुझ्या मालकाला आज जिवंत सोडणार नाही, आमचे व्यवहाराचे पैसे का देत नाही?" अशी दमदाटी केली. या टोळक्याने लोखंडी कोयते आणि लाकडी दांडक्यांनी अशोककुमार यांच्या कारची तोडफोड सुरू केली. वार चुकवताना फिर्यादीच्या हाताला दांडक्याचा फटका बसला आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
advertisement
महिलेला वेदना असह्य पण डॉक्टर गाढ झोपेत; जगात येण्याआधीच बाळाचा करुण अंत, पुण्यातील घटनेनं खळबळ
स्वसंरक्षणार्थ गोळीबार
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून, अशोककुमार सिंग यांनी स्वसंरक्षणार्थ आपल्याजवळील बंदुकीतून हवेत दोन गोळ्या झाडल्या. याच दरम्यान, हल्लेखोर टोळीतील रोहित मदन कुर्मा (रा. पिंपरी) याच्या डोक्यात गोळी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराच्या या घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
मृत आरोपीवर गुन्हे दाखल
मृत हल्लेखोर रोहित मदन कुर्मा याच्यावर पिंपरी, निगडी आणि मंचर पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्यात ४ ते ५ मोटारसायकलींचा वापर करण्यात आला होता. कामशेत पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
