TRENDING:

PCMC Diwali Bonus : िपंपरी महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; खात्यात जमा होणार 'इतकी' रक्कम

Last Updated:

Pcmc Announced Diwali Bonus : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या साडेसहा अधिकारी आणि कर्मचारी यांच्या साठी मोठी खुश खबर आहे. कर्मचाऱ्यांसाठी आयुक्त शेखर सिंह यांनी बोनसची घोषणा केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या साडेसहा हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. महापालिकेच्या आयुक्त शेखर सिंह यांनी दिवाळीपूर्वी बोनस देण्याची घोषणा केली आहे. या बोनसमध्ये महापालिकेत काम करणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सामील असतील  ज्यात सेवानिवृत्त, निलंबित किंवा मानधनावर काम करणारे कर्मचारीही येतात.
News18
News18
advertisement

आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी सामान्य सानुग्रह अनुदानाशिवाय अतिरिक्त बोनसही जाहीर केला आहे. या बोनसची रक्कम कर्मचार्‍यांच्या पदानुसार ठरवण्यात आली आहे. प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्यांना अडीच लाख रुपये बोनस मिळणार आहे तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम चाळीस हजार रुपये आहे.

या बोनसमुळे महापालिकेतील अधिकारी तसेच कर्मचारी आनंदात आहेत कारण त्यांना महिन्याच्या पगारासमान रक्कम बोनस स्वरूपात मिळणार आहे. ही योजना दिवाळीपूर्वीच दिल्यामुळे त्यांच्या उत्सव साजऱ्यासाठी आर्थिक सहाय्य होईल. या निर्णयामुळे कर्मचार्‍यांचा मनोबल वाढेल आणि कामातही प्रेरणा मिळेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात इथं मिळते प्रसिद्ध लेमन टी, चव अशी की एकदा प्याल तर पुन्हा याल
सर्व पहा

आयुक्तांनी या बोनसाद्वारे कर्मचार्‍यांच्या योगदानाचे कौतुक केले असून महापालिकेतील कामाची गुणवत्ता वाढवण्याचा हा एक सकारात्मक उपाय असल्याचे सांगितले. यामुळे महापालिकेतील सर्व पदांवरील कर्मचारी उत्साहाने काम करणार आहेत. एकूणच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी ही दिवाळी खास ठरणार आहे कारण आयुक्तांच्या या निर्णयामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळेल.

मराठी बातम्या/पुणे/
PCMC Diwali Bonus : िपंपरी महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; खात्यात जमा होणार 'इतकी' रक्कम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल