गावकऱ्यांचा संताप प्रचंड वाढला असून विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एकत्र येत आवाज उठवला. कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र डुंबरे, जय बजरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल डुंबरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास डुंबरे, प्रगतशील शेतकरी शरद फापाळे यांसह अनेक मान्यवरांनी ही सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली. आम्ही कित्येक महिन्यांपासून मागणी करतोय.पण, अजूनही बस सेवा सुरु झालेली नाही,अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
advertisement
यावरच थांबून नाही, तर ओतूर-मुंबई सकाळी 11 वाजताची थेट सेवा देखील बंद करून तिच्या जागी नारायणगाव-मुंबई बस सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ओतूर आणि परिसरातील प्रवाशांना आता थेट मुंबई गाठणे कठीण झाले आहे. पुणे असो वा मुंबई, कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांना आता खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत.
दररोज हजारो प्रवासी या बसांवर अवलंबून होते. पण, आता बस नसल्यामुळे वेळेत पुणे किंवा मुंबई गाठणे म्हणजे डोकेदुखी झाली आहे. एवढी मोठी लोकसंख्या असताना थेट सेवा बंद ठेवणे म्हणजे गावकऱ्यांची सरळफटक दुर्लक्ष करण्यासारखे आहे,अशी प्रतिक्रिया स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली. प्रशासनाने तातडीने ही सेवा पुन्हा सुरू केली नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.