पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला आहे. गौरीमयी (नाव बदललंय) असं आरोपी महिलेचं नाव आहे. या महिलेनं एका ४७ वर्षीय विवाहित इसमावर बलात्कार केल्याचा आरोप असून या प्रकरणी पीडित इसमाने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल केला आहे.
पुरुषावर ३ वेळा झाला प्रयत्न
advertisement
धक्कादायक म्हणजे, पीडित पुरुषावर या महिलेनं ३ वेळा शारीरिक संबंध प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप फिर्यादीने एफआयआर कॉपीमध्ये केला आहे. पीडित व्यक्ती हा ४७ वर्षांचा आहे. तो मुळचा कोल्हापूर इथं चंदगडमध्ये राहणार आहे. पीडित इसमाला दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. आरोपी गौरीमयी (नाव बदललंय) ही पुण्यात राहणारी आहे, तिची आणि आरोपीची ओळख तुळजापूरच्या मंदिरात झाला होती. त्यानंतर ओळख वाढवून आरोपी महिलेनं इसमाला पुण्यात राहत्या घरी राहायला बोलावलं. घरी आल्यानंतर तिने या इसमाला 'तुम्हाला भाऊ माणणार असून भावाचं नातं ठेवणार आहे. मी हायकोर्टात वकिलीची प्रॅक्टीस करत असून माझे खूप मोठमोठ्या ओळखी आहेत. त्या ओळखीने तुमचे जे काही काम असेल ते मी तुम्हाला भाऊ या नात्याने करून देईन' असं आश्वासन दिलं होतं.
आता तुमची बेस्ट फ्रेंड अन्...
दुसऱ्या दिवशी तिला कलावती मंदिर बेळगाव इथं दर्शनासाठी जायचे असल्यानं मला विनंती केल्याने मी तिला दुचाकीवरुन घेऊन जात असताना त्यावेळी तिने सांगितलं की. यापुढे तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड आहात तुमच्या अडचणीला मी नेहमी उभी राहीन. त्यावेळी ती माझ्या जवळीक करत असल्याने त्यावेळी मी तिला झटकण्याचा प्रयत्न केला. जाताना तिने मला घाणेरडे वाक्य ऐकवण्यास सुरुवात केल्यानं त्यावेळी मी तिला असे मला चालणार नाही. यापुढे तू आमच्या गावी येवू नको, असं खडसावलं.
लॉजवर जवळ येण्याचा प्रयत्न
त्यानंतर दुसरा एक असाच प्रसंग घडला. आरोपी महिलेनं चंदगड स्टँडपर्यंत सोडण्यासाठी फिर्यादीला विनंती केली. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून चंदगड स्टँडकडे निघाले. पण तिला वॉशरूम ला जायचे असल्यानं 'मी उघड्यावर वॉशरुमला जात नाही मला लॉजमधील रुममध्ये वॉशरूमला जायचं आहे', अशी विनंती केल्याने त्याठिकाणी असलेल्या एका लॉजवर फिर्यादी तिला घेऊन गेला. तिथे गेल्यावर लॉजच्या रुममध्ये गेलेनंतर मला रुममध्ये येण्यास विनंती करून बोलावून. 'मी खूप मोठी वकील आहे यापुढे मी तुमची साथ देईन, तुमच्या मुलाला मंत्रालयातील लोकांच्या ओळखीने नोकरीला लावेन', अशी आशा दाखवून माझा हात धरुन ओढण्यास सुरुवात केली. त्यावेळी मी तिला नकार देत खाली येवून थांबलो', असता थोड्या वेळाने ती देखील खाली आली.
काशी विश्वनाथला जाण्याचा प्लॅन
त्यानंतर 13/02/2025 रोजी ते दिनांक 15/02/2025 रोजीपर्यंत दोन दिवस आरोपी महिला फिर्यादीच्या घरी थांबली होती. त्यांनतर ती पुण्याला गेलेनंतर तिथून माझ्या पत्नीला कॉल करुन सांगितलं की, आम्ही पुण्यातून माझी मैत्रीण स्वाती आणि तिची फॅमिली असे सर्वजण काशी विश्वनाथ दर्शनासाठी जाणार आहोत. मी तुमच्या पतीला भाऊ समजून सोबत घेवून जाणार आहे. कारण, सध्या प्रयागराज मध्ये कुंभमेळावा भरला आहे. विश्वनाथला माझ्या सोबत पाठवा त्यावेळी माझ्या पत्नीने मला देवदर्शन घेवून या असं सांगुन पुण्याला पाठवलं.
फ्लॅटवर दिलं गुंगीचं औषध आणि अतिप्रसंग
25/02/2025 रोजी काशी विश्वनाथला जायचं असल्याने मी पुण्यात स्वारगेटवर आलो. त्यावेळी बहीण या नात्याने एक मोबाईल दिला. सांगितलं की, 'तुम्ही एकटे राहु नका माझ्या घरी चला. तिच्या कोथरुडमधील घरी राहण्यास गेलो त्यानंतर तिने माझा मोबाईल काढून घेतला. सांगितलं की, 'स्वातीची सासू वारले असून त्यांचे येणे कॅन्सल झाले आहे. त्यामुळे आपण दोघेच विमानाने जायचे आहे. आपल्या दोघांच्या विमानाचे तिकीट मी काढले आहे. असं सांगितलं आणि मला तिच्या बेडरुममध्ये झोपवलं. त्यावेळी मी झोपलो असताना तिने मला काहीतरी प्यायला देवून माझ्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी मी रागाच्या भरात तिथून निघून जात असताना माझा हात धरून माफी मागून जर येथून तू गेला तर तुला इथेच काहीतरी करीन, मी जे सांगेन त्याच पद्धतीने राहायचे. त्यानंतर 26/02/2025 रोजी काशी विश्वनाथला जायचे आहे, असे सांगून धमकी देवून जबरदस्तीने मला मुंबई एअरपोर्टवरुन काशी एयरपोर्टला नेले. त्यानंतर तिने मला धमकावलं की आता तू माझ्या कब्जात आहे जर काही कुरकुर केली तर तुला तुझ्या घरी जाऊन देणार नाही, तुझे कुटुंब उद्धवस्त करेन. मी घाबरून देवदर्शनासाठी होकार दिला.
३ दिवस काशी विश्वानाथमध्ये मुक्काम आणि रूम
त्यानंतर तिने मला देवदर्शनासाठी घेऊन तेथील पंडितांना माझ्या बाबतीत वाईट होणार आहे, असं सांगण्यास सांगितल्याने तेथील पंडितांनी मला शनी आहे, सोन्याची अंगठी घालावी लागेल, असं सांगितलं होतं. त्यानंतर तिने मला 3 दिवस जबरदस्तीने काशी विश्वनाथ ला ठेवून घेतले. मी वेगळी रूम करण्यास सांगितलं असता तू जर शहाणपण दाखवला तर तुला तुझ्या घरी जाणेस जागा ठेवणार नाही, असं धमकावलं. मी ज्या रुममध्ये होतो त्या रुममध्ये येवऊन माझ्या सोबत शारीरिक संबंधाची मागणी करुन जवळीक करु लागली.
२ लाख रुपये देण्याची धमकी
घाबरत घाबरत मी तिच्यासोबत पुण्याला आलो. पुण्यात आल्यानंतर जबरदस्तीने कल्याण ज्वेलर्स या ठिकाणी घेवून जावून एक सोन्याची अंगठी खरेदी करुन मला घालण्यास सांगितलं. जे काही झाले आहे ते कोणाला सांगितलं तर तुझी बदनामी करेन. तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर मला आताच्या आता 2 लाख रुपये दे, नाहीतर तुझ्या विरोधात पोलीस स्टेशन इथं जावून खोटी केस करेन, असं धमकावलं. त्यानंतर कसा बसा मी तिच्या तावडीतून सुटका करून बसने चंदगडला माझ्या गावी गेलो. माझ्या घरी गेल्यानंतर झालेला सर्व प्रकार माझ्या पत्नीला सांगितल्यानं माझ्या पत्नीने तिला फोनवर झाडलं.
घरी येऊन केली शिवीगाळ
पुणे तिने काही फोन केला नाही. थोड्या दिवसांनी पुन्हा कोणत्या न कोणत्या नंबर वरून कॉल करुन मला 2 लाख रुपये दे नाहीतर माझ्याकडील फोटो व्हायरल करेल, मी खूप लोकांना असं फसवलं आहे. जर तूला या कचाट्यातून बाहेर पडायचे असल्यास आत्ताच्या आता 2 लाख रुपये पाठव. अशी धमकी दिली. त्यानंतर गौरी बांजळे ही कोल्हापुर येथे येवुन माझ्या पत्नीला फोन करून शिवीगाळ करुन सर्व खोटा प्रकार सांगून माझ्या सर्व वस्तू परत करण्यास सांगितल्यानं मी आणि माझी पत्नीने तिने दिलेल्या सर्व वस्तू कोल्हापूर येथे जावून परत करुन यापुढे कोणतेही संबंध न ठेवण्यास सांगितलं.
पोलिसांनी काय केली कारवाई?
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितलं की, आरोपी महिला आणि फिर्यादी इसमाची तुळजापूर देवी मंदिरात ओळख झाली होती. ५ महिन्यांपूर्वी मार्च महिन्यात ही घटना घडली होती. मार्च महिन्यात फिर्यादी आणि आरोपीचं काही साथीदार हे तुळजापूरला फिरायला गेले होते. त्यानंतर काशी विश्वनाथ इथं गेले होते. ओळखीचा फायदा घेत काशी विश्वनाथ इथं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला' असं कदम यांनी सांगितलं.
तसंच 'हा माझा भाऊ आहे हे सांगत काही देवाण घेवाण झाल्याची पण माहिती आहे. या महिलेवर एक अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल झाला असून आरोपी महिलेला नोटीस देऊन चौकशीसाठी बोलवलं आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.
