पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ गुरुवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास पुन्हा बिबट्या दिसला आहे. पुणे विमानतळावरून विमानांची मोठ्या प्रमाणात रात्रीही वाहतूक सुरू असते. त्यामुळे रात्रीच्या वेळीही इथे लोकांची गर्दी पाहायला मिळते. अशात आता प्रवशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. इथे गेल्या दोन दिवसांत दोन वेळा बिबट्याचे दर्शन घडलं आहे.
टॅक्सी वे क्रमांक के -4 इथे हा बिबट्या दिसला. बिबट्या ज्या ठिकाणी आढळून आला, त्या ठिकाणाहून काही अंतरावरच पार्किंग बे क्रमांक 8, 9 आणि 10 आहेत. रात्रीच्या वेळी या तिन्ही ठिकाणी विमानं थांबली होती. मात्र, सुदैवानं बिबट्या धावपट्टीवर आला नाही. हा बिबट्या याच आठवड्यात दोनदा धावपट्टीजवळ आढळून आला आहे. मंगळवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री बिबट्या टॅक्सी वे - ४च्या परिसरात आढळून आला.
advertisement
Pune News : प्रसूतीवेळी नेमकं काय घडलं? पतीची कोर्टात धाव अन् मिळाली 20 लाखाची भरपाई
सर्वांत आधी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला हा बिबट्या दिसला. त्यानंतर गुरुवारी ग्राउंड स्टाफच्या काही कर्मचाऱ्यांना तो दिसला. वन विभागाने याआधीच विमानतळ प्रशासनाला लोहगावच्या दिशेने असणाऱ्या विमानतळाच्या संरक्षक भिंतीची डागडुजी करण्यासंदर्भात कळवलं आहे. मात्र, अद्याप ही भिंत तशीच आहे. विमानतळ प्रशासनाने या पत्राची दखल घेतलेली नाही. त्याच भिंतीमधून बिबट्या विमानतळाच्या आत दाखल झाला असल्याचं वन विभागाचं म्हणणं आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याला पकडण्यासाठी लोहगावच्या परिसरात पिंजरे लावले आहेत. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याच्यावर नजरही ठेवली जात आहे
