पुणे : दांडपट्टा हे मराठ्यांचे आवडते शस्त्र आहे. या शस्त्राला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने राज्यशास्त्र म्हणून मान्यता दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दांडपट्टा या शस्त्राला 'राज्य शस्त्र' म्हणून घोषित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. पण हे शस्त्र आहे नेमकं कसं असतं, त्याचा इतिहास नेमका काय आहे? हे आज आपण जाणून घेऊयात.
advertisement
दांडपट्ट्याचा इतिहास -
दांडपट्ट्याची भेदकता ही तलवारी सारखी जहाल अशी आहे. मराठ्यांच्या विशेष पसंतीस उतरलेले शस्त्र म्हणून दांडपट्टा ओळखले जाते. हे शस्त्र मध्ययुगीन काळात उदयास आले. दांडपट्ट्याचे वजन हे जवळपास 1 ते 2 किलो असते. पोलादी बनावटीच्या दांडपट्ट्याची रचना ही मुळात दोन भागात विभागली गेली. एक म्हणजे खोबळा आणि दुसरे म्हणजे पाते (मूठ नसलेल्या तलवारीचे पाते) तर दांडपट्ट्याचा खोबळा म्हणजे या शस्त्राची मूठ होय.
हा खोबळा योध्याचा हात तळव्यापासून ते कोपऱ्यापर्यंत झाकून टाकतो. त्यामुळे हातावर वेगळ्या बाजूबंदाची गरज भासत नाही. तसेच या शस्त्राच पात सरळ आणि लवचिक असते. या पट्ट्याचे दीड धारी, धुधारी, एकधारी असे याचे प्रकार पडतात. या शस्त्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचे विशेष प्रेम असल्याचं दिसून येते. आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्कालीन प्रतिमा पाहिल्या तर त्यात त्यांच्या हातात हे शस्त्र दिसून येते.
पुढे ब्रिटिश काळातही हे शस्त्र आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी देशाच्या चळवळीत वापरले, याचे अनेक पुरावेदेखील आढळतात. या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून मान्यता मिळाल्याने ही शस्त्रकला जपणाऱ्या प्रशिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सरकारचे आभार मानले आहे. हल्ली एके 47 च्या जमान्यात देखील दांडपट्टा स्वयंः संरक्षणासाठी शिकणं, ही काळजी गरज असल्याचे शस्त्र अभ्यासक प्रद्योत पेंढारकर यांनी सांगितले.
शासन निर्णय काय? महाराज तसेच त्यांच्या मावळ्यांनी लढायांमध्ये वापरलेला \"पट्टा\" (स सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक 202402191036168123 असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.