मुंबई शहर आणि उपनगरात 12 जानेवारीला सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे. मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.
12 जानेवारीला पुण्यामधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील थंडीचा जोर कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 जानेवारीला अंशतः ढगाळ आकाश असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील थंडीचा जोर कमी होताना दिसून येत आहे.
उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये 12 जानेवारीला अंशतः ढगाळ आकाश राहणार असून तेथील कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस नाशिक मधील किमान तापमान स्थिर राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूर मधील किमान तापमानात 4 अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे विदर्भातील थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. नागपूर मध्ये 12 जानेवारीला धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे.
गेले 2 दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. 12 जानेवारीला राज्यातील वातावरण कोरडे राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्याचबरोबर विदर्भातील किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.