मुंबई : मागील काही दिवसांमध्ये राज्यातील किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे उष्णतेमध्ये देखील वाढ झाल्याचे जाणवत आहे. राज्यातील पुणे आणि नागपूर येथे कमाल तापमान 36 अंशापर्यंत पोहोचल्यामुळे दुपारच्या वेळी उष्णता जाणवत आहे. तर नाशिक आणि मुंबईमध्ये किमान आणि कमाल तापमान तुलनेने कमी असल्याचे पाहायला मिळतंय. पाहुयात 5 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 2 अंशांनी वाढवून 33 अंश सेल्सिअस राहणार आहे. तर किमान तापमानात 1 अंशाने वाढ होत 18 अंश सेल्सिअस एवढे राहील. पुढील काही दिवसांमध्ये मुंबईतील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये किमान तापमान तुलनेने कमी असलं तरी कमाल तापमान चांगलच वाढलं आहे. पुण्यामध्ये 5 फेब्रुवारी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे राहील. तर पुण्यामध्ये सकाळच्या वेळी धुकं तर त्यानंतर आकाश निरभ्र राहील.
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारनंतर ढगाळ आकाश होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे पाहायला मिळेल. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढे राहील. नाशिकमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील सर्वात जास्त किमान आणि कमाल तापमान नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे. पुण्याच्या बरोबरीने नागपूरमध्येही 36 अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे. तर नागपूरमधील आकाश सामान्यतः निरभ्र राहण्याची देखील शक्यता आहे. एकंदरीत राज्यात केवळ सकाळच्या वेळी हलकी थंडी जाणवत असून दुपारच्या वेळी तीव्र उष्णता जाणवत असल्याचे पाहायला मिळते. नागपूर आणि पुण्यामध्ये किमान तापमान 36 अंशापर्यंत पोहचला आहे.