६ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
फुरसुंगी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव राहुल उत्तम पठारे (वय ३९, रा. होळकरवाडी) असं आहे. त्याने होळकरवाडी येथीलच रहिवासी आणि शेजारी असलेल्या अभिजित पठारे यांच्या घरी घरफोडी केली.
अभिजित पठारे हे विवाहाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले असताना, राहुलने संधी साधून त्यांच्या घरातून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरी केले. या दागिन्यांची किंमत अंदाजे ६ लाख १४ हजार रुपये आहे. अभिजित पठारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फुरसुंगी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
advertisement
मुन्नाभाई MBBS स्टाईलने डॉक्टर बनला अन् वादात सापडला, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलीस कर्मचारी सागर वणवे आणि अभिजित टिळेकर यांना बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. ही चोरी राहुल पठारे यानेच केली असून, त्याने चोरलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने महंमदवाडी येथील एका सराफी पेढीत विकले आहेत, असं त्यांना समजलं.
पोलिसांनी राहुलला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने नर्तकीसोबतच्या बैठकीचा आणि नाच-गाण्याचा छंद पूर्ण करण्यासाठी त्याला पैशांची गरज होती, म्हणून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी राहुल आणि फिर्यादी अभिजित हे एकाच परिसरात राहात असल्याने राहुलचे अभिजित यांच्या घरी येणे-जाणे होते. या ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
